Uttara Baokar : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे पुण्यात निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

uttara baokar passed away at 79 in pune
uttara baokar passed away at 79 in pune
social share
google news

Uttara Baokar Passed Away : बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर (Uttara Baokar) यांच निधन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून त्या आजारी होत्या. पुण्यात त्यांनी वयाच्या 79 वर्षी अखेरचा श्वास घेतला. उत्तरा बावकर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होतेय. तसेच मनोरंजन विश्वासह इतर क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. (uttara baokar passed away at 79 in pune national award winning actress)

ADVERTISEMENT

कुटूंबियांकडून मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनूसार, उत्तरा बावकर (Uttara Baokar) यांचे वय 79 वर्ष होते. गेल्या एक वर्षापासून त्या आजारी होत्या.पुण्याच्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध अभिनेता मनोज जोशी यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. उत्तरा बावकर यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

1984 मध्ये उत्तरा बावकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच मृणाल सेन यांना एक दिन अचानक या सिनेमासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. उत्तरा बावकर यांनी हिंदी चित्रपटांसोबत मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

हे वाचलं का?

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे बारकावे शिकलेल्या उत्तरा बावकर (Uttara Baokar)  यांनी ‘मुख्यमंत्री’मध्ये पद्मावती, ‘मीना गुर्जरी’मध्ये मीना, शेक्सपियरच्या ‘ऑथेलो’मध्ये डेस्डेमोना आणि नाटककार गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक’ नाटकात आईची भूमिका साकारली होती. यासह अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये संस्मरणीय पात्रे साकारली होती.

गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘तमस’ या चित्रपटातील अभिनयानंतर उत्तरा बावकर (Uttara Baokar) या प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. सुमित्रा भावे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. याशिवाय त्यांनी उडान, अंतराल, रिश्ते कोरा कागज,नजराना, जस्सी जैसी कोई नही आणि जब लव हुआ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT