विठू माऊलीचा गाभारा मोगरा व शेवंतीच्या फुलांनी सजला
श्री क्षेत्र पंढरपुरात आज आमलकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली. पंढरपूर ही महाराष्ट्राचीच नव्हे तर संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांचे हे महापीठ म्हणून ओळखलं जातं. पंढरपुरात आषाढ, कार्तिक, माघ आणि चैत्र या महिन्यातील शुद्ध एकादशीस तर चंद्रभागेच्या काठी भक्तिप्रेमाचा पूरच […]
ADVERTISEMENT

श्री क्षेत्र पंढरपुरात आज आमलकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली.
पंढरपूर ही महाराष्ट्राचीच नव्हे तर संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांचे हे महापीठ म्हणून ओळखलं जातं.
पंढरपुरात आषाढ, कार्तिक, माघ आणि चैत्र या महिन्यातील शुद्ध एकादशीस तर चंद्रभागेच्या काठी भक्तिप्रेमाचा पूरच येतो.
आजही वारकरी संप्रदायाकडून या परंपरा मोठ्या निष्ठेनं, आनंदानं आणि सहजतेनं जपल्या जातात.
विठू माऊलीला पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.