Walmik Karad : पोलिसांच्या 'या' दोन अ‍ॅक्शन, वाल्मिक कराड शरण येणार? संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट

मुंबई तक

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेशावरून वाल्मिक कराड यांच्या सर्व बँकेतील अकाऊंट गोठवण्याचे आणि कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्किम कराड आज शरण येणार?

point

CM फडणवीसांच्या आदेशानंतर बँक खाती गोठवली

point

वाल्किम कराडच्या पत्नीचीही चौकशी

Walmik Karad Beed : मसाजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधीत खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचे सर्व बँक अकाउंट गोठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सीआयडी कडून कार्यवाहीचे  आदेश देण्यात आलेत.

हे ही वाचा >> 2000 Note Exchange Racket : शेंगदाने विकणारा चालवत होता 2000 ची नोट बदलण्याचं रॅकेट, नागपुरात रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसजवळ...

मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेशावरून वाल्मिक कराड यांच्या सर्व बँकेतील अकाऊंट गोठवण्याचे आणि कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. 

वाल्मिक कराड यांचे सर्व आर्थिक व्यवहाराचे खाते असलेल्या बँकेतील संपूर्ण खाते गोठण्याच्या सूचना संबंधित विभागाला व बँकेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

हे ही वाचा >> Beed Weapon License : बीडमध्ये शेकडोने बंदुका, परवाना कसा मिळतो? शासन कुणाला देतं शस्त्र बाळगण्याची परवानगी? वाचा सविस्तर

सीआयडी कडून आतापर्यंत 100 लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास 100 हून अधिक लोकांची कसून अशी चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये वाल्मीक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांची देखील दोन दिवसांपूर्वी कसून अशी चौकशी करण्यात आली होती. त्याचबरोबर वाल्मिक कराड याचे अंगरक्षक असलेल्या दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. एकूणच खाते गोठवण्याच्या आणि पत्नीच्या चौकशीच्या दोन निर्णयानंतर सीआयडीला यश येत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड कधी शरण येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


हे वाचलं का?

    follow whatsapp