Thane Crime : डोक्यात वार करुन जागीच संपवलं, सोबत राहणाऱ्या मजुरांनीच केली कामगाराची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरच्या डोक्यावर अनेक वार करण्यात आले होते, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह सापडल्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाण्यात कामगाराची डोक्यात वार करुन हत्या

सोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांनीच केला घात

पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय समोर आलं?
Thane Crime News : कल्याण शहरात काल एक धक्कादायक घटना समोर आली. तीन बांधकाम मजुरांनी आपल्याच सहकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं कल्याण हादरलं. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. सोमवारी सकाळी खडवली गावातील एका स्थानिक रहिवाशानं शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिला तेव्हा त्यांनी पोलिसांनी कळवलं. सागर सुरेश गोठाधे असं या मृतदेहाचं नाव आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सागर तीन इतर कामगारांसह एका टिन शेडमध्ये भाड्याने राहत होता. हे सर्व कामगार नाशिकचे रहिवासी होते आणि समृद्धी महामार्गावर बांधकाम करण्याचं काम करत होते.
हे ही वाचा >> अब्दुल 2 हँड ग्रेनेड घेऊन निघालेला राम मंदिरात, घडवणार होता विध्वंस; पण...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरच्या डोक्यावर अनेक वार करण्यात आले होते, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह सापडल्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या हत्येप्रकरणी पोलिसांनी विशाल, बद्री आणि गणेश नावाच्या तीन कामगारांनीच त्याची हत्या केल्याचा संशय आहे. हे तिन्ही कामगार घटना घडल्यापासून फरार आहेत. हत्येमागील कारणं अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांची कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा >> Pune: पुण्यात 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार, भावासोबत बसवून काढले आक्षेपार्ह व्हिडीओ
दरम्यान, प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल केला आणि फरार आरोपींचा शोध सुरू केला. लवकरच आरोपींना पकडलं जाईल आणि हत्येमागील कट उघड होईल, असं पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.