Jalna Crime News : प्रेम प्रकरणातून वाद, घराबाहेर झोपलेल्या तरूणाला नेलं, खून करून जाळून टाकलं
तरूणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याच पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणातील 2 आरोपींना बदनापूर पोलिस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जालन्यात सैराटपेक्षाही भयंकर हत्याकांड

प्रेम प्रकरणातून तरूणाला झोपेतच उचलून नेलं

घराजवळ असलेल्या शेततळ्यात जाळून फेकून दिलं
Jalna Crime News : जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावातील तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. घराबाहेर झोपलेला मुलगा सकाळी सापडत नसल्यानं कुटुंबाने त्याचा शोध घेतला असता गावाबाहेर त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर या घटेनं जालना जिल्हा हादरला होता. आता या घटनेचा उलगडा झाला असून, प्रेमप्रकरणातूनच या मुलाची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा >> Kailas Phad : बीड पोलिसांना उशिरा जाग? शरद पवारांच्या नेत्याला मारहाण करणाऱ्या कैलास फडवर...
तरूणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याच पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणातील 2 आरोपींना बदनापूर पोलिस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 9 फेब्रुवारीला आकाश बबन जाधव हा 22 वर्षीय तरुण रात्री घराबाहेर झोपेत असताना, त्याला उचलून नेऊन जाळून मारून टाकण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या घटनेचा तपास करत असताना दोघांना जेरबंद केलंय. गणेश मिसाळ आणि बालाजी मिसाळ अशी ताब्यात घेतलेल्या 2 आरोपींची नाव आहेत. सदर 2 आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 14 तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
कशी समोर आली होती घटना?
हे ही वाचा >> Samay Raina च्या मदतीला धावली भारती? म्हणाली, त्याचा शो तसाच आहे, पण तो मुलगा...
एखाद्या चित्रपटाची कथा असावी अशी घटना जालन्याच्या बदनापूरमध्ये घडली होती. घराबाहेर झोपलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा सकाळी जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली होती. तरुणासोबत नेमकं काय घडलं याचा शोध घेणं आता पोलिसांसमोरील आव्हान होतं. आकाश नेहमीप्रमाणे त्याच्या घराच्याबाहेर झोपला होता. सकाळी वडील त्याला उठवण्यासाठी गेले तेव्हा तो त्याच्या जागेवर दिसला नाही. काही वेळाने आकाशच्या वडीलांनी इतरांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यावेळी घरापासून साधारण 500 मीटर अंतरावर एका शेततळ्यात आकाशचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने सगळेच हादरुन गेले. आकाशचा घातपात कोणी व कशासाठी केला हे अद्याप समोर आलेलं नाही.