PM Narendra Modi म्हणाले.. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीडिओ कॉन्फरनद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीडिओ कॉन्फरनद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचं कार्य हे आजही आपल्या देशाला प्रेरणा देणारं असतं. छत्रपती शिवरायांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही असंही मोदी यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासाचे शिखर पुरूष आहेत. भारताचा वर्तमानकाळ आणि भूगोलही त्यांची अमरगाथा सांगतो आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक खूप मोठा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या सध्याच्या स्वरूपाची, भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे हे शिवरायांचे भक्त आहेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
बाबासाहेब पुरंदरे हे वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत असतानाच आपला देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करतोय. बाबासाहेबांनाही हा योगायोग म्हणजे त्यांना भारतमातेने दिलेला आशीर्वादच वाटत असणार यात शंका नाही असंही मोदी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेबांनी देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो आम्हाला कायमच प्रेरणा देत राहणार आहेत, असंही बाबासाहेबांच्या कार्याचं कौतुक करताना मोदींनी म्हटलंय. तरुण इतिहासकारांनी बाबासाहेबांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे इतिहासाबरोबरच बाबासाहेबांनी वर्तमानाचीही काळजी घेतली, गोवा मुक्ती संग्रामापासून ते दादरा नगर हवेलीच्या संघर्षाच्या वेळेस त्यांची भूमिका कौतुकास्पद ठरल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे त्यासाठी आपण सर्वच त्यांचे ऋणी राहू. या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देशाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे. मी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना मी करतो, अशा शब्दांसह मोदींनी बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT