Shiv Sena UBT BMC march: ‘तुमच्या फाइल्स बनवल्या..’ आदित्य ठाकरेंचं कोणाला आव्हान?

मुंबई तक

ADVERTISEMENT

aditya thackeray long march on bmc office and criticize cm eknath shinde government
aditya thackeray long march on bmc office and criticize cm eknath shinde government
social share
google news

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला.मुंबईकरांच्या पैशांच्या उधळपट्टीचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील विविध भागातून शिवसेनेच पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चानंतर आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुमच्या फाईल्स बनवल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही आणि पोलिस येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहोत, असा थेट इशाराच आदित्य ठाकरे यांना दिला आहे. (aditya thackeray long march on bmc office and criticize cm eknath shinde government)

ADVERTISEMENT

”हे मुंबईतल भगव वादळ आहे, महाराष्ट्रातलं अजून सुरु केले नाही”, असे विधान करून आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. या आंदोलनाचे निवेदन देणार का? असे विचारण्यात आले. मी म्हटलं चोरांना काय निवेदन देणार. जी काय चोरी केलीय ती आमच्या नजरेत आलीय. ज्या दिवशी आमचे सरकार येईल तेव्हा आम्ही तुम्हाला जागा दाखवून, असा हल्लाबोलच आदित्य ठाकरे यांनी केला.

हे ही वाचा : ‘समृद्धीवर कोणी गेलं की लोकं म्हणतात देवेंद्रवासी झाला…’, शरद पवार असं का म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी यावेळी पहिला रस्ता घोटाळा सांगितला. मुंबईत सगळे रस्ते कॉक्रिटीकरण, खड्डेमुक्त करणार होते. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी कधीच कामाचा विचारच केला नाही. सांगितले एका रात्रीच जसे 40 लोक गुवाहाटीला पळाले तशी मुंबईची लुट करू, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. तसेच यांचे पाच कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत, यासाठी बरोबर 5 लोकांसाठी पाच पाकिटे बनवून मुंबईची कामे वाटून दिली आहे,असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.ऑगस्टमध्ये टेंडर काढलं, एकही मित्र आला नाही, म्हणून टेंडरच रद्द केले. हे असे काम चाललंच. त्यानंतर 5000 कोटीचे टेंडर 6 हजार 80 कोटींवर नेले. 40 टक्के फायदा कॉन्ट्रॅक्टरचा करून दिला, असा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला.

हे वाचलं का?

तसेच ”तुम्हाला पप्पू चॅलेंज देतो, या अंगावर एकटे या किंवा पूर्ण फौजेला घेऊन या.आहे माझी तयारी माझ्या छातीवर वार करायला या, असे थेट आव्हानच आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले. तसेच 50 रस्त्यामधून एक सुद्धा रस्ता पुर्ण करता आला नाही. मुंबईसाठी काम करत आहात की खोके सरकारच्या दलालांसाठी काम करत आहात, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी स्ट्रीट फर्निचर हा दुसरा घोटाळा सांगितला. खोके सरकार 100 टक्के भ्रष्ट आहे.आतूनही भ्रष्ट, बाहेरून भ्रष्ट आहे. मला माहितीय यांच्या सभेला गर्दी होत नाही, मग खुर्च्या,बेंचेस कशाला घेताय? 40 हजार बेंचेस लावणार कुठे? 10 हजार कुंड्या घेतायत,या कुंड्यात काय लावणार हेच माहित नाही. हे सर्व वर्षभऱापासून होत आहे,अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : समृद्धी हायवे अपघात: ‘टायर तर नवीनच टाकलेले…’, ‘त्या’ बस मालकाने सगळंच सांगितलं!

मुंबई महापालिकेच्या पैशातून कोणत्या 13 गोष्टी विकत घेणार आहात. 13 गोष्टी कोणत्या आहेत आणि त्याची रक्कम काय? ज्या गोष्टी 100 कोटीहून जास्त नसायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी 263 कोटीला जातायत. हे आपलं दुर्भाग्य आहे. किती मोठा घोटाळा हे मुंबई महापालिकेत करत आहे. या घोटाळ्याचीही मी नोंद घेतली आहे. त्यामुळे तुम्हाला आत टाकणार म्हणजे टाकरणारच,असा इशाराच यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे यांनी पुढे चौथा घोटाळा सॅनिटरी पॅड वेंडींग मशीनचा बाहेर काढला. 5 हजार बाथरूम नसताना 5 हजार मशीन काढतात विकत घ्यायला. 23 हजाराचे मशीन 72 हजाराला विकत घ्यायचा प्रयत्न आहे तो अनिल परब यांनी विधानभवनात अडवून धरला आहे,असे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.महापालिकेत जे चाललंय ते योग्य नाही आहे. मुंबईच्या ठेवी 600 कोटी होत्या त्या 92 हजार कोटी पर्यंत आम्ही नेल्या. याला म्हणतात आर्थिक नियोजन. तसेच यांना दिल्लीसमोर कटोरा घेऊन उभे करायचे आहे, असा हल्लाबोल देखील आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT