Dharmveer 2 : ‘सिनेमा आवडो न आवडो आता…’,CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

cm eknath shinde criticize ubt shiv sena uddhav thackeray on dharmveer 2 maharashtra politics
cm eknath shinde criticize ubt shiv sena uddhav thackeray on dharmveer 2 maharashtra politics
social share
google news

CM Eknath Shinde criticize UBT Uddhav Thackeray On Dharmveer 2 : दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा जीवनावर आधारीत असलेल्या धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागाचे चित्रिकरण लवकरच सुरु होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी बोलताना काही लोकांना हा सिनेमा खटकला, सिनेमा बघता बघता उठून गेले, काही सीनही आवडले नाही. पण आता कोणालाही आवडो न आवडो, आता फुल ऑथोरीटी आपण आहोत, असे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. (cm eknath shinde criticize ubt shiv sena uddhav thackeray on dharmveer 2 maharashtra politics)

ADVERTISEMENT

धर्मवीर सिनेमाच्या पहिल्या भागातील अभिनेत्यांनी केलेल्या कामाचे यावेळी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. चित्रपटासोबतच अधूनमधून मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना चिमटा काढत होते. सरकार स्थापन झाल्यापासुन सगळेच बोलतायत, सरकार पडणार, सरकार जाणार, आता ज्योतिषी (उद्धव ठाकरे) थकले. आता म्हणायला लागले मुख्यमंत्री बदलणार. पण आता सरकार पडण्याऐवजी आणखी मजबूत होत गेले, 200 प्लस आमदार आमच्याकडे झाले असल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

हे ही वाचा : Bollywood स्टार किड्सचा आवडता Orry करतो तरी काय? BB17 मध्ये केले अनेक खुलासे!

शिंदे पुढे म्हणाले, शेवटी आपण आपले काम केले पाहिजे, कुठल्या तरी स्वार्थापोटी मला काय मिळेल, या पेक्षा मी या राज्याला आणि देशाला काय देतोय, हे महत्वाचे आहे, असे शिंदे म्हणतात.

हे वाचलं का?

काही लोकांना आधीच सिनेमा आवडला नाही, ते उठून निघून गेले, तेव्हा ते सुप्रीमो होते, आता मी सुप्रीमो आहे. आता कोणालाही आवडो न आवडो, आता फुल ऑथोरीटीने आपण आहे, त्यामुळे सिनेमा आता सगळ्यांना आवडणार आहे. काहींची थोडी घुसमट होतेय, अजीर्ण झालंय. पण यावर आपण वर्षभरापू्र्वीच गोळी दिलीय, असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

हे ही वाचा : Crime : संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; तरूणासोबत बर्थडे पार्टीत…

आम्ही दिघेसाहेबांच्या तालमीत शिकलो आहोत. त्यामुळे गोळी कधी द्यायची, छोटी द्यायची की मोठी द्यायची हे कळतं. कधी इजेक्शन द्याव लागतं. कधी ऑपरेशनही करावं लागतं. मी डॉक्टर नाही आहे पण ऑपरेशन करून टाकलं,असेही शिंदे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT