Nana Patole: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार! पाच नावं स्पर्धेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

major shake-up in Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC), State president Nana Patole may be removed
major shake-up in Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC), State president Nana Patole may be removed
social share
google news

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात मधल्या काळात पक्षातीलच काही नेत्यांनी नाराजीचा सूर लावला होता. हे प्रकरण काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत गेलं होतं. तेव्हापासूनच महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली होती.

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसमधील गटबाजी समोर आली होती. हे प्रकरण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत गेलं होतं. तेव्हापासूनच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वा बदलाची चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नवा चेहरा येईल असं सांगण्यात येत असून, यासाठी काही नाव स्पर्धेत आहेत. ‘लोकमत’ने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होणार असल्याबद्दलचे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा >> Exclusive: तांबे, पटोले की थोरात… अशोक चव्हाणांनी नेमकं कोणाला सुनावलं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी आणि आपसातील राजकारण समोर आलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आमदार सत्यजित तांबे यांनी थेट नाव न घेता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ठपका ठेवला होता. त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांनी पत्र लिहून काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त करत पटोलेंसोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.

पाच नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत

वृत्तानुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेता बदलला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील काँग्रेस नेतृत्व राज्यात अध्यक्ष मराठा आणि विधिमंडळ नेता दलित अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर हे बदल केले जाणार असून, नितीन राऊत, बंटी ऊर्फ सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि अशोक चव्हाण यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब

नितीन राऊत यांची नजर विधिमंडळ पक्षनेतेपदावर असली, तरी त्यांचे सुपुत्र कुणाल राऊत हे महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. दुसरीकडे अशोक चव्हाण यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. तर बंटी पाटील यांची अलीकडेच विधान परिषदेतील काँग्रेस नेतेपदी नियुक्ती केली गेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांचं नाव आघाडीवर दिसत आहे.

ADVERTISEMENT

8 राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार?

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे गेली आहेत. आता काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच त्याच्या आगे मागे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचीही तयारी करत आहेत. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने पक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा >> Satyajeet Tambe: मी जर प्रदेशाध्यक्ष असतो, तर…; तांबेंचं मोठं विधान

रायपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पक्ष बांधणीवर चर्चा झाली होती. त्याचवेळी काही राज्यात बदल करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. काँग्रेस 8 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT