मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित? विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसला २४ वर्षांनी बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळणार आणि ते नाव मल्लिकार्जुन खरगे यांचं असणार हे निश्चित मानलं जातं आहे. ३० सप्टेंबरला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख होती. या तारखेला मल्लिकार्जुन खरगे यांची एंट्री झाली. गुरूवारी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे या लढतीत मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.

ADVERTISEMENT

मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय निश्चित का मानला जातो आहे?

गांधी घराण्याशी भेट घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी अर्ज भरला आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आजच मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेच्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसला राज्यसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणून इतर कुठल्या तरी नेत्याची निवड करावी लागणार आहे. राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये दिग्विजय सिंह, पी चिदंबरम, जयराम रमेश असे काही नेते आहेत ज्यांच्यापैकी एकाची वर्णी या पदावर लागू शकते.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीबाबांसह ‘यांनी’ केल्या उमेदवारी अर्जावर सह्या

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात

मल्लिकार्जुन खरगे यांनी आणि शशी थरूर यांनी ३० सप्टेंबरला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरला. यात मल्लिकार्जुन खरगे यांची निवड ही जवळपास निश्चित मानली जाते आहे. १७ ऑक्टोबरला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे तर १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. मुख्य लढत ही खरगे विरूद्ध थरूर अशीच आहे. त्यात खरगे यांना गांधी घराण्याकडून झुकतं माप असल्याने त्यांचाच विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? खरगे की थरूर?

ADVERTISEMENT

कट्टर काँग्रेसी आहेत मल्लिकार्जुन खरगे

पुढचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा असला पाहिजे? हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला असता ते म्हणाले की अध्यक्ष कुणीही झालं तरी हरकत नाही, पण त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचे विचार, विश्वास, धोरण आणि भारताविषयीचा दृष्टीकोन या सगळ्याचं प्रतिनिधीत्व होतं. राहुल गांधी यांनी जे सांगितलं त्या उत्तरात मल्लिकार्जुन खरगे हे एकदम फिट बसतात. कारण मल्लिकार्जुन खरगे हे कट्टर काँग्रेसी आहेत. त्यांनी अगदी कार्यकर्ता पदापासून काँग्रेसमधली कारकीर्द सुरू केली आहे. १९६९ मध्ये ते गुलबर्गा सिटी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले.

ADVERTISEMENT

मल्लिकार्जुन खरगे यांचे विरोधी पक्षांशीही सौहार्दाचे संबंध

मल्लिकार्जुन खरगे यांचे विरोधी पक्षांशीही सौहार्दाचे संबंध आहेत. भारत जोडो यात्रा आज कर्नाटकात पोहचली. आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी ही यात्रा बेल्लारी असणार आहे. तर १९ ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक हे काँग्रेससाठी महत्त्वाचं राज्य मानलं जातं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT