Video: 'महायुतीला मतदान केलं नाही तर 3000 वसूल करू...', भाजप महिला नेत्याचं धक्कादायक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Megharani Jadhav On Ladki Bahin Yojana
Megharani Jadhav On Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या महिला नेत्या लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय म्हणाल्या?

point

...म्हणून मतदारांना दिला सज्जड दम

point

महिला नेत्याचा 'तो' व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

Megharani Jadhav On Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेतेमंडळी बेधडक वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लाडकी बहिण योजनेवरून कलगीतुरा रंगला आहे. भाजपच्या महिला नेत्यानं मतदारांना दम भरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीड हजार रुपये दिले आहेत, महायुतीला मतदान केलं नाही, तर 3 हजार वसूल करू, असं खळबळजनक विधान कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी केलं आहे. जाधव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

ADVERTISEMENT

महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे. परंतु, या योजनेबाबत नेतेमंडळी बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनीही लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.

हे ही वाचा >> Narendra Modi: खुशखबर! PM नरेंद्र मोदींनी महिलांसाठी केली 'या' मोठ्या योजनेची घोषणा

त्यानंतर आता भाजपच्या महिला नेत्या मेघारानी जाधव यांच्य वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.''बायकांनो तुम्हाला शपथ आहे, तुम्ही आता धनुष्यबाणालाच मतदान करायचं. जर नाही केलं आणि इकडे तिकडे काही कळालं...त्यांनी 1500 दिलेत, तुमच्याकडून 3000 रुपये वसूल करू", असं जाधव आपल्या भाषणात म्हणाल्या. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही  वाचा >> Lokpoll Survey: महायुती सरकारला धोका? मविआला किती जागा मिळणार? लोकपोलच्या सर्व्हेनं उडवली खळबळ

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा कळीचा बनला आहे. जवळपास 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं महायुती सरकारकडून सांगण्यात येतंय. परंतु, महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्ष राज्य सरकारला या योजनेवरून धारेवर धरत आहेत. मतांच्या स्वार्थापोटी लाडकी बहीण योजना महायुतीने सुरु केलीय, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला या निवडणुकीत कितपत होतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT