Dilip Walse Patil : पहिला वार! शरद पवारांची वळसे-पाटलांनी काढली ‘उंची’
दिलीप वळसे-पाटील शरद पवार बातमी : वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीये. शरद पवारांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातील जनतेने कधीच बहुमत दिलं नाही, असं वळसे-पाटील म्हणालेत.
ADVERTISEMENT
Dilip Walse Patil Sharad Pawar : शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असे सांगणाऱ्या दिलीप वळसे-पाटील यांनी पहिला वार केला. वळसे-पाटलांनी शरद पवारांची राजकीय उंची काढली. इतकंच नाही, तर पवारांच्या राजकीय नेतृत्वावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे यावरून राष्ट्रवादीतील दोन्ही गटात संघर्ष वाढण्याचीच चिन्ह दिसत आहेत.
ADVERTISEMENT
जुन्नर तालुक्यातील मंचर येथे कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. ममता बॅनर्जी, मायावती यांचा उल्लेख करत दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांना लक्ष्य केलंय.
वाचा >> Sharad Pawar: ‘ईडीच्या भीतीने तिकडे गेले, आता म्हणतात राष्ट्रवादी…’, शरद पवारांनी सुनावलं
वळसे-पाटील म्हणाले, “आपण काही भाजपमध्ये गेलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे. आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. चिन्ह कुणाला मिळेल? नाव कुणाला मिळेल? यासंदर्भात काही दिवसांत निवडणूक आयोगात चर्चा होईल. त्यांचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात हलचल होऊ शकते”, असे वळसे-पाटील म्हणाले.
हे वाचलं का?
दिलीप वळसे-पाटील शरद पवारांबद्दल काय बोलले?
पुढे बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की, आज आपण पाहिलं तर शरद पवार यांच्या उंचीचा दुसरा नेता देशामध्ये नाही, असं आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या एकट्याच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही त्यांना बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही”, असं म्हणत दिलीप वळसे-पाटलांनी पवारांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली.
वाचा >> CWC : अशोक चव्हाणांचं काँग्रेसकडून प्रमोशन! राष्ट्रीय कमिटीमध्ये महाराष्ट्रातील 8 नेते
“तिकडे ममता बॅनर्जी होताहेत. मायावती होताहेत. अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष पुढे जाताहेत आणि आपले उत्तुंग नेते असताना आपण काही ठराविक नंबर्सच्या पुढे जाऊ शकत नाही. आमचे जास्तीत जास्त 60-70 आमदार निवडून येतात. मग कुणाशी तरी आघाडी करायला लागते. या पक्षाशी आघाडी, नाहीतर त्या पक्षाशी आघाडी. अर्थात हा निर्णय जो आहे, तो मतदार करत असतो. हा आपला निर्णय नसतो”, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT