Sanjay Raut : शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलनंतरच अजितदादांबद्दल राऊत रोखठोक?
शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलनंतरच राऊतांनी अजित पवारांबद्दल रोखठोक भुमिका मांडली का, दादांच्या बंडाची मागणी पवारांच्या सांगण्यावरूनच राऊतांनी लीक केली का, अशा चर्चा सुरू झाल्यात.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीतील बंड राहिलं, बाजूला पण आता संजय राऊत (Sanjay Raut) आणि अजित पवारांमध्येच (Ajit Pawar) वादाचा खटका उडालाय. पवार-राऊतांमध्ये वार-पलटवार सुरू झालाय. अजित पवारांनी हा वाद पक्षाच्या पातळीवर मांडणार असल्याचं म्हटलंय. तर राऊतांनी विषय शरद पवारांच्या (Sharad Pawar) कोर्टात नेलाय. त्यामुळेच शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलनंतरच राऊतांनी अजित पवारांबद्दल रोखठोक भुमिका मांडली का, दादांच्या बंडाची मागणी पवारांच्या सांगण्यावरूनच राऊतांनी लीक केली का, अशा चर्चा सुरू झाल्यात.
ADVERTISEMENT
पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा अजित पवारांभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं. आणि हा संशय दुसऱ्यातिसऱ्या कुठून नाही, तर शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या संजय राऊतांच्या रोखठोकमुळे निर्माण झाला.
संजय राऊतांनी १६ एप्रिलला रविवारी रोखठोक सदरात महाराष्ट्रात फोडाफोडीचा सीझन टू सुरू असल्याचा दावा केला. आतापर्यंत दबक्या आवाज सुरू असलेल्या या चर्चांना राऊतांनी शरद पवारांचा हवाला दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
हे वाचलं का?
शरद पवारांसोबत बैठक अन् रोखठोक
त्याचं झालं, असं की उद्धव ठाकरे राऊतांसोबत ११ एप्रिलला मंगळवारी सिल्वर ओकवर शरद पवारांना भेटायला गेले. यावेळी सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती होती. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.
हेही वाचा >> अजित पवारांच्या न झालेल्या बंडाची Inside Story!आठवड्यात नेमकं काय घडलं?
याच भेटीचा उल्लेख राऊतांनी रोखठोकमध्येही केला. राऊत लिहितात, “उद्धव ठाकरेंबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचं नाही. पण कुटुंबाला टार्गेट केलं जातंय. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांचा सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील, असं पवार-ठाकरे यांचं मत पडलं.”
ADVERTISEMENT
“पवारांनी एक चांगला मुद्दा मांडला. ‘आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल. पण या ईडी सीबीआयच्या फायली कधीच बंद होत नाहीत.”
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या बंडाच्या चर्चेची सुरूवात
शरद पवारांचा दाखला देऊनच राऊतांनी आपली सगळी रोखठोक मांडणी केली. मविआची नागपुरात सभा असलेल्या दिवशीच राऊतांनी हा बॉम्ब टाकला. रविवारी, सोमवार आणि मंगळवारची दुपार असे जवळपास अडीच दिवस अजित पवारांच्या बंडाची देशभर चर्चा सुरू झाली. पण अडीच दिवसात ना अजित पवारांनी या चर्चा फेटाळल्या. ना राऊतांचा रोखठोक दाखला शरद पवारांनी नाकारला.
हेही वाचा >> अजित पवारांचा भांडाफोड शरद पवारांनीच केला? वागळे काय म्हणाले?
अशातच मंगळवारी दुपारी अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना बंडाच्या चर्चा निराधार, बिनबुडाच्या असल्याचा दावा केला. त्याचवेळी पवार राऊतांवरही चांगलंच भडकले. नाव न घेता राऊतांवर निशाणा साधला. “तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं मुख्यपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असं झालं, तसं झालं… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत”, असं अजित पवार स्पष्टच बोलले.
अजित पवार राऊतांवर चांगलेच भडकलेले दिसले. दुसऱ्या दिवशी बुधवारी राऊतांनीही उत्तर दिलं. संजय राऊतांनी सत्य बोलण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आणि आपण कुणाच्या बापाला भीत नाही, असं उत्तर दिलं. त्याचवेळी अजित पवारांच्या टीकेवर आपण केवळ शरद पवारांचंच ऐकतो, असं सांगत पलटवार केला. शिंदे, भाजपवर आरोप करणाऱ्या राऊतांनी चक्क शरद पवारांच्या पुतण्याला सुनावलं.
हे बघिततलं का >> ‘शिवसेनेत गद्दारी करवली, आता आणखी काही पक्षात करताहेत’ उद्धव ठाकरे यांचं सूचक विधान कुणासाठी?
राऊतांनी लिहिलं, त्यावरून राष्ट्रवादीत बंडाचं महाभारत घडलं. पण हे महाभारत खरं होतं की खोटं याचा उलगडा अजून झाला नाही. उलट पवारांनी बंडाच्या चर्चा आमच्या मनात नसल्याचं म्हटल्यानं उलटसुलट चर्चांना आणखी उधाण आलंय. बंडाच्या चर्चा शमल्या असल्या, तरी पवारांनी सिल्वरओवर ठाकरेंना सांगितलं, सामनात छापलं, ते खरं की खोटं हा प्रश्न तसाच आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT