‘समृद्धीवर कोणी गेलं की लोकं म्हणतात देवेंद्रवासी झाला…’, शरद पवार असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar criticized dcm devendra fadnavis very sharp words buldhana bus accident samruddhi highway
sharad pawar criticized dcm devendra fadnavis very sharp words buldhana bus accident samruddhi highway
social share
google news

Maharashtra Political News in Marathi: पुणे: बुलढाणात (Buldhana) समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या बस अपघातात (Bus Accident) 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरुन आता या महामार्गामध्ये काही तांत्रिक दोष असल्याचे म्हटलं जात आहे. याच घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार टोलाही हाणला. ‘जर अपघातात एखादी व्यक्ती गेली तर महामार्गाच्या नजीकच्या गावातील काही लोकं असं म्हणतात की तो देवेंद्रवासी झाला..’ असं म्हणत पवारांनी खास त्यांच्या शैलीत याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (ncp chief sharad pawar criticized dcm devendra fadnavis very sharp words buldhana bus accident samruddhi highway maharashtra politics news latest)

ADVERTISEMENT

‘…तर लोकं म्हणतात देवेंद्रवासी झाला’

‘समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी मी त्या भागात गेलो होतो.. या रस्त्याने जावं हे मी ठरवलं. मी माझा मार्ग बदलला.. आणि त्या रस्त्याने जात असताना तिथे काही लोक होते म्हणून गाडी थांबवली… नाही तर कुठे लोकंही भेटत नाही त्या रस्त्यावर.. त्या लोकांना विचारलं की, तुमचा अनुभव काय..’

‘त्यांनी सांगितलं की, ‘या रस्त्याच्या संबंधीची महाराष्ट्रात फार चर्चा झाली होती, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद-दुसरा अपघात बघायला मिळतो. त्याचं कारण कदाचित… या महामार्गाचं शास्त्रियदृष्ट्यानियोजन केलेलं नसावं. त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत.’

हे वाचलं का?

‘लोक कळत-नकळत त्यांना दोषी ठरवतात’

‘आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की,.. ते लोकं सांगत होते.. एखाद-दुसरी व्यक्ती अपघाताने गेली.. तर लोक असं म्हणतात या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.’ असं म्हणत या महामार्गात काही दोष असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत-नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ”टायर फुटलाच नाही…” RTO चा खळबळजनक रिपोर्ट, समृद्धीवर घडलं तरी काय?

‘अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच-सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी.’ असंही पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘समृद्धी महामार्गाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा’

‘संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी. कुठे चूक झालेली आहे… कशामुळे चूक झाली आहे. ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे.’

‘माझं वैयक्तिक मत आहे. आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजूबाजूला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे.’

‘एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यात महत्त्वाचे बदल करावेत. असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत.’ असा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

भाजपला पवारांची टीका झोंबली, दिलं प्रत्युत्तर.. म्हणाले त्या लोकांना ‘शरदवासी’ म्हणायचं?

दरम्यान, शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना ‘देवेंद्रवासी’ असा जो उल्लेख केला तो भाजपला चांगलाच झोंबला आहे. त्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. प्रत्युत्तर देताना काही दाखले देत बावनकुळे म्हणाले की, त्यावेळी जे मृत्यू पावले त्यांना ‘शरदवासी’ म्हणायचं का?

चंद्रशेखर बावनकुळे यांचं पवारांवर टीका करणारं ट्वीट

मग त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी ‘ म्हणायचे का ?

समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी मा. देवेंद्र फडणवीसजींनी जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. असंख्य वाहने धावत आहेत. वेळेची बचत होत आहे.

हे ही वाचा>> Buldhana Accident: समृद्धी महामार्गावरील बस अपघातातील मृतांची यादी

देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. असे सगळे सर्वांना माहीत असूनही, मा. देवेंद्रजींचा व्यक्तिगत विरोध करताना खालची पातळी आज श्री.शरद पवार यांनी गाठली. समृद्धी महामार्गावरील या अपघाताबद्दल मत मांडताना कळस गाठला. “आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.”

पवारसाहेब, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले.

पवार गोवारी विसरले!
पवार मावळचा गोळीबार विसरले..!
पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले…!

हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले.

• गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता पवार साहेब त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते.

• मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे.

• मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही.

पवारसाहेब, या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत.
*मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का?*

पवारसाहेब, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले.
पवारसाहेब, तुम्ही आज मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे, ही म्हणही सिद्ध करून दाखवली. असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT