लोकसभेला पराभूत झालेल्या हंसराज अहिरांचं पुनर्वसन; मोदी सरकारने दिली नवी जबाबदारी
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. या नियुक्तीमधून एकप्रकारे अहिर यांचं २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुनर्वसन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कोण आहेत हंसराज अहिर? हंसराज गंगाराम अहिर हे महाराष्ट्राच्या […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. या नियुक्तीमधून एकप्रकारे अहिर यांचं २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुनर्वसन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत हंसराज अहिर?
हंसराज गंगाराम अहिर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नावं मानलं जातं. कार्यकर्ते त्यांना हंसराज भैय्या या नावानं ओळखतात. १९९४ ते १९९६ साली ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यानंतर १९९६, २००४, २००९ आणि २०१४ असे ४ वेळा ते चंद्रपूरमधून भाजपतर्फे लोकसभेवर निवडून गेले. २०११ ते २०१४ असे सलग चार वर्ष अहिर यांना संसद रत्न म्हणूनही गौरविण्यात आलं आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कोळसा खाण वाटप घोटाळा उघडकीस आणणारे नेते :
देशातील गाजलेला कोळसा खाण वाटप घोटाळा उघडकीस आणणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. या घोटाळ्याला कोलगेट असेही म्हणतात. त्यांच्याच प्रयत्नांनंतर सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये चार वगळता सर्व कोळसा खाणींचे वाटप रद्द केले होते. ते काही दिवस संसदेच्या कोळसा, स्टील आणि खाण समितीमध्ये सदस्यही होते.
२०१९ साली लोकसभेला झाला होता पराभव :
२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर-वणी-अर्णी मतदारसंघातून हंसराज अहिर यांचा पराभव झाला आहे. ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करत बाळू धानोरकर यांनी तत्कालिक केंद्रीय गृह राज्यमंत्री असलेल्या आणि चार वेळा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अहिर यांचा तब्बल ४४ हजार ७६३ मतांनी पराभव केला.
ADVERTISEMENT
फडणवीसांनी केलं अभिनंदन :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियुक्तीनंतर हंसराज अहिर यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
Heartiest congratulations to Former Union Minister @ahir_hansraj bhaiyya for being appointed as the Chairperson of National Commission for Backward Classes.
Wishing you a very successful tenure ! pic.twitter.com/9wD2vytJLl— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 25, 2022
ADVERTISEMENT