Uddhav ठाकरेंची नवी खेळी, थेट अदाणींच्या ऑफिसवर का नेणार मोर्चा?
Uddhav Thackeray: 16 डिसेंबर रोजी शिवसेनेचा प्रचंड मोर्चा हा धारावीतून अदाणींच्या ऑफिसवर नेण्यात येईल. अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray vs Adani: मुंबई: ‘सरकार प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रकल्प हा अदाणी समूहाच्या घशात घालत आहे.’ असा गंभीर आरोप शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहेत. मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असा धारावी पुर्नविकास प्रकल्प हा अदाणी समूहाकडे (Adani Group) गेल्याने याबाबत काही शंका व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी थेट एका मोर्चाची घोषणा केली आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. (shiv sena ubt chief uddhav thackeray will lead a direct march on adani office on december 16 a new dispute over the dharavi project)
ADVERTISEMENT
‘ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून, बलिदान देऊन 1960 साली मिळवली आहे. ती आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. आम्ही ती कोणालाही आंदण देऊ देणार नाही. याकरिता आम्ही सरकारला जाब विचारण्यासाठी, अदाणींना सुद्धा स्पष्टीकरण विचारण्यासाठी, येत्या 16 तारखेला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा धारावीतून अदाणींच्या ऑफिसवर जाईल.’ अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे.
हे ही वाचा >> Manoj Jarange Patil : ‘तो एकटाच वळवळत सुटलाय!’, जरांगेंची भुजबळांवर पुन्हा एकेरी टीका
उद्धव ठाकरे आक्रमक, अदाणींविरोधात मोर्चा… पाहा काय म्हणाले नेमकं
शिवसेना आज प्रशासनात नाही. पण शिवसेनेची ताकद प्रशासनात असणं किंवा नसणं यात नाही तर शिवसेनेची ताकद ही रस्त्यावरची आहे. ती ताकद आज पुन्हा एकदा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. या सगळ्या प्रकरणात सरकारला फायदा कुठे होणार हे स्पष्ट नाही. या प्रकल्पात 20 टक्के सरकार आणि अदानींना 80 टक्के वाटा मिळणार.
हे सरकार केवळ आणि केवळ कंत्राटदारांसाठी काम करतंय. एक तर नियोजनशून्य कामामुळे प्रदूषण.. ते प्रदूषण रोखण्यासाठी यंत्र.. त्याचं पुन्हा कंत्राट.. म्हणजे हे सगळं कंत्राटदारांचं सरकार आहे.
मुंबईतील तीन महत्वाचे प्रोजेक्ट जिथे क्लस्टर प्रोजेक्ट होत आहेत. हे सुद्धा त्यांच्या घशात किंवा खिशात घालण्याचं काम सरकार करतंय. यातील तीन मोठे प्रकल्प म्हणजे अभ्युदय नगर, आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लेमेशन याचा पुनर्विकास हे अदाणींना देण्याचं सुरू आहे.
पूर्वी एक वाक्प्रचार होता की, सब भूमी गोपाल की.. तसं आता मुंबई अदाणी की..
ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून, बलिदान देऊन 1960 साली मिळवली आहे. ती आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. आम्ही ती कोणालाही आंदण देऊ देणार नाही. याकरिता आम्ही सरकारला जाब विचारण्यासाठी, अदाणींना सुद्धा स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या 16 तारखेला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा धारावीतून अदाणींच्या ऑफिसवर जाईल.
कारण कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी विचारलं पाहिजे. धारावीकरांना सुद्धा आवाहन करतो की, तुमच्या जागा बळकावू देऊ नका. जर कोणी गुंडगर्दी करायला आले तर शिवसेनेकडे या.. सरकारला सुद्धा सांगतोय की, तुम्ही नावाप्रमाणे मिंधे होऊ नका. कारण तुमचे सुद्धा दिवस भरत आले आहेत आता.
सुप्रीम कोर्टाची तारीख जवळ येत चालली आहे. इथे काही झालं तरी सुप्रीम कोर्ट बसलं आहे वर. त्यामुळे तुम्ही जाता-जाता मुंबाई या देवीच्या नावावरून पडलेलं मुंबई हे शहर कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाची तरी धुणी-भांडी करताना केवळ आणि केवळ खुर्ची मिळाली म्हणून ती आंदण देऊ नका. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील टीका केली आहे.
हे ही वाचा >> Uddhav : ठाकरेंचं थेट PM मोदींना आव्हान, ‘हिम्मत असेल तर…’
दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर आता राज्य सरकार तसंच अदाणी समूह नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT