Ketaki Chitale: 'तुम्ही दळिद्रीपणा करणार आहात का?', फडणवीसांबद्दल बोलताना केतकी चितळेची घसरली जीभ!

मुंबई तक

ADVERTISEMENT

फडणवीसांबद्दल बोलताना केतकी चितळेची घसरली जीभ!
फडणवीसांबद्दल बोलताना केतकी चितळेची घसरली जीभ!
social share
google news

Ketaki Chitale Video: मुंबई: मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chital) हिने आज (13 जून) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दिलेल्या 10 कोटी रुपयांविरोधात केतकीने प्रचंड संताप व्यक्त केला. याबाबत बोलताना केतकी चितळे खूपच आक्रमक झालेली दिसून आली. एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना तिचा तोलच ढासळला. (actress ketaki chitale also criticized deputy chief minister devendra fadnavis while commenting on the waqf board)

ADVERTISEMENT

केतकीने सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तीन तिघाडी सरकार.. असं म्हणत केतकीने महायुती सरकारची हेटाळणी देखील यावेळी केली. तसंच तुम्हाला तुमच्या बाजूला हिंदूही नकोयत का? असा सवालही तिने विचारला.

हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : ठाकरेंचा अचानक मोठा निर्णय! उमेदवार घेतला मागे

देवेंद्र फडणवीसांवर बोलताना केतकी चितळेचा तोल ढळला... 

'राष्ट्रात जिथे-तिथे मोर्चे निघतायेत.. की वक्फ बोर्ड रद्द करा.. आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये देताय. आधीच तीन तिघाडी सरकार आहे तुमचं. ठरवलंयत काय.. तुम्हाला तुमच्या बाजूला हिंदूही नकोयत का? हे ही ठरवलंय का तुम्ही?'

हे वाचलं का?

हे ही वाचा>> "विधानसभेला 288 जागांवर उमेदवार पाडणार", जरांगेंचा महायुतीविरोधात एल्गार

'म्हणणं काय तुमचं.. एक परत स्वत:च्या काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका.. काका माझं चुकलं मला माफ करा मला परत घ्या. दुसरी व्यक्ती काय करतेय.. तीन चाकी सायकल चालवता येत नाहीए.. डोक्यात हवा गेलेली आहे.. म्हणून मी माझी तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो. असं म्हणणारए...' 

'तिसऱ्याचं तर काय.. राजीनामा स्वीकारतच नाहीए.. माझा राजीनामा घ्या.. माझा राजीनामा घ्या.. हे मान्य केलं जात नाहीए.. म्हणून या पद्धतीने तुम्ही राजीनामा सोडा.. तुम्ही दळिद्रीपणा करणार आहात का? तुमचं म्हणणं काय आहे? की, बघा दहावीतील मुलगा म्हणतो की, बघा मी आता फेलच होऊन दाखवेन.. तसं तुम्ही तुमची किती संख्येने मतं कमी करणार आहात हे ठरवलंय का?' असं विधान केतकीने यावेळी केलं आहे.

सर्वाधिक मालकीची जागा ही भारत सरकारची आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर वक्फ बोर्ड आहे. यांना रद्द केलंच पाहिजे. पण तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय.. 

ADVERTISEMENT

अरे निर्लज्ज माणसांनो.. थोडा, थोडा तरी.. 

ADVERTISEMENT

संघाला तोडलं, सनातनींना तोडतायेत.. नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की, नोटा एवढा भिकारीपणा या जगात नसेल. पण थँक्यू तीन तिघाडी सरकार.. तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटण दाबेन..

आता केतकीच्या या विधाननंतर तिच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT