‘बेडूक कितीही फुगला तरी..’, BJP च्या जिव्हारी लागली जाहिरात; खासदाराने शिंदेंना सुनावलं!
‘बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होऊ शकत नाही.’ अशी थेट टीका भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. ज्यानंतर आता राजकीय वर्तुळात याचे प्रतिसाद उमटताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics News: झका खान, वाशिम: ‘बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होऊ शकत नाही.’ अशी थेट टीका भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर (CM Eknath Shinde) केली आहे. त्यामुळे आता भाजप-शिवसेनेचा (BJP-Shivsena) वाद हा चव्हाट्यावर आला आहे. काल (13 जून) एक जाहिरात (Advertisement) समोर आली होती. ज्यामुळे आता भाजपच्या नेत्यांचा पारा चढला आहे. अशावेळी खासदार अनिल बोंडे यांनी तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर थेट टीका केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच उलटसुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
भाजप खासदार बोंडेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका
‘बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होऊ शकत नाही.कालच्या जाहिरातीचा तो विषय संपला आहे. भाजपाचे कार्यकर्ते आणि जनतेच्या मनातील मी बोललो आहे. गेल्या सरकारमध्ये संजय राऊत नावाची व्यक्ती होती. त्याने शिवसेना बरबाद केली. त्याचप्रमाणे आताही कालच्या जाहिरातीमागे कुणी तरी आहे. त्याला भाजपा-सेना युतीमध्ये वितुष्ठ आणायचे आहे.’
हे ही वाचा >> ‘तुझ्या मरणानंतरच माझी सुटका होईल…’, आईला तडफडून संपवणाऱ्या मुलीची खळबळजनक कबुली
‘एकनाथ शिंदे यांना संपूर्ण भाजपने आणि सर्व लोकांनी स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीए. उद्धवजी ठाकरेंना वाटत होतं की, मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथ शिंदे यांना वाटतंय की, ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हा असा चेहरा आहे की, जो बहुजनांसाठी काम करतो. सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं आहे.’ असं म्हणत डॉ. बोंडे यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री शिंदेंवरच टीका केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ती जाहिरात अन् फडणवीस नाराज?
दरम्यान, काल जी जाहिरात माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याची जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली होती. कारण फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबत असलेला त्यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करून टाकला होता.
ती नेमकी जाहिरात काय होती?
नुकताच ‘झी न्यूज आणि मॅटराईझ’ या संस्थेने सर्वे केला. त्यात जर आत्ता निवडणुका झाल्या, तर राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार बहुमताने घरवापसी करेल, असा म्हटलं गेलं. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना बघायला जास्त आवडेल असं सर्व्हेमध्ये म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
36 हजार लोकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. 23 मे ते 11 जून या कालावधीमध्ये हा सर्वे करण्यात आला असल्याचं ‘झी’ कडून सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांना 26 टक्के पसंती देण्यात आली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना 23 टक्के पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना 11 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अशोक चव्हाणांना 9 टक्के, तर अजित पवारांना 7 टक्के व तर इतरांना 24 टक्के पसंती देण्यात आली आहे.
याच सर्व्हेनंतर सर्व माध्यमांमध्ये एक जाहिरात देण्यात आली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना सर्वाधिक पसंती आणि त्यानंतर फडणवीसांना दुसरी पसंती असं दाखवण्यात आलं होतं. या जाहिरातीत फक्त एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांचाच फोटो फक्त वापरण्यात आला होता. हीच जाहिरात फडणवीसांच्या जिव्हारी लागली असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा >> Sambhuraj Desai : एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीसाठी किती कोटी झाले खर्च?
दरम्यान, ही जाहिरात शिवसेनेने दिली नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे सांगितलं होतं. कोणी तरी अज्ञाताने ही जाहिरात दिल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
पहिल्या जाहिरातीनंतर भाजप नेत्यांची स्पष्ट नाराजी समोर आल्यानंतर शिवसेनेने तात्काळ डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज पुन्हा एकदा एक नवी जाहिरात शिवसेनेकडून देण्यात आली. ज्यामध्ये फडणवीस-शिंदेंचा फोटो वापरण्यात आला असून त्यात युती सरकारला मोठा जनादेश एवढाच आशय वापरण्यात आला आहे.
पण या जाहिरातीच्या सगळ्यात खाली जे 9 मंत्र्यांचे फोटो लावण्यात आले आहेत ते नऊही मंत्री हे शिवसेनेचे आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण ज्या नऊ मंत्र्यांचे फोटो हे आजच्या जाहिरातीत लावण्यात आले आहेत. त्यापैकी 5 मंत्र्यांवर भाजप नेतृत्व नाराज असल्याचं वृत्त आहे. मात्र तरीही त्या पाचही मंत्र्यांचे फोटो हे आवर्जून लावण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नेमका काय संदेश द्यायचाय याची देखील चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT