Ram Mandir: “आपल्याला आज ‘श्रीमंत योगी’ मिळालाय..” महाराष्ट्रातील ‘या’ महाराजांकडून मोदींची शिवरायांसोबत तुलना!
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर व्यासपीठावरुन बोलताना गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली आहे. पाहा गोविंदगिरी महाराज नेमकं म्हणाले
ADVERTISEMENT
Ayodhya Ram Mandir Live Updates: अयोध्या: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अत्यंत जल्लोषात पार पडला. गेले अनेक महिने या सोहळ्याची तयारी सुरू होती. सर्वांचे डोळे दिपवून टाकणारा असा हा सोहळा होता. याच सोहळ्यासाठी साधू-संतांना विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यापैकीच एक गोविंदगिरी महाराज यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर व्यासपीठावर भाषणाची संधी मिळाली. यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. (ayodhya ram mandir inauguration govindgiri maharaj of maharashtra made a comparison prime minister modi with chhatrapati shivaji maharaj)
ADVERTISEMENT
‘आपल्या देशात तपाची पंरपरा आहे. ही परंपरा पाहता मला फक्त एक राजा लक्षात येतो.. ज्याच्यामध्ये हे सगळं होतं. तो राजा म्हणजे.. छत्रपती शिवाजी महाराज! आज आपल्याला देखील तशाच स्वरूपाचे महापुरुष प्राप्त झाले आहेत. आपल्याला आज श्रीमंत योगी प्राप्त झालाय..’ असं म्हणत गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशीच एक प्रकारे तुलना केली आहे.
हे ही वाचा>> Ayodhya Ram Mandir Live: ‘शिवाजी राजांना संन्यास घ्यायचा होता..’, PM मोदींसमोर ‘त्या’ महाराजांचं वक्तव्य
‘आपल्याला आज श्रीमंत योगी प्राप्त झालाय..’, वाचा गोविंदगिरी महाराज पंतप्रधान मोदींबाबत नेमकं काय म्हणाले..
जेव्हा ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी एक शब्द ऐकला होता. तो म्हणजे तप.. पण आज तप कमी झालं आहे.. पण ते तप आपण साकार करत आहात. ही परंपरा पाहता मला फक्त एक राजा लक्षात येतो.. ज्याच्यामध्ये हे सगळं होतं. तो राजा म्हणजे.. छत्रपती शिवाजी महाराज!
लोकांना माहिती नाही की, ते स्वत: जेव्हा मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले होते तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला आणि तीन दिवस शिव मंदिरात राहिले. महाराजांनी तेव्हा असं म्हटलं की, मला राज्य करायचं नाही.. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शिवाच्या आरधनेसाठी जन्म घेतलाय. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत घेऊन जाऊ नका.
इतिहासातील तो विलक्षण प्रसंग आहे. त्यावेळी त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजवलं की, आणि त्यांना परत आणलं. त्यांना सांगितलं की, तुमचं हे कार्य देखील भगवत सेवाच आहे.
आज आपल्याला देखील तशाच स्वरूपाचे महापुरुष प्राप्त झाले आहेत. ज्यांना भगवती जगदंबेने स्वत: हिमालयातून परत पाठवलं की, जा भारत मातेची सेवा कर. तुला भारतमातेची सेवा करायची आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास स्वामींची आठवण आली. त्यांनी शिवाजींचं वर्णनं केलं की, ‘निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारू.. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी..’ आपल्याला आज श्रीमंत योगी प्राप्त झालाय..
हे ही वाचा>> PM Modi Speech : “काही लोकं म्हणत होते, राम मंदिर बनलं तर आग लागेल”
असं म्हणत गोविंदगिरी महाराज यांनी अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराजांशीच तुलना केली आहे. तसेच भगवती जगदंबेनेच मोदींना भारतमातेच्या सेवेसाठी हिमालयातून परत पाठविले असल्याचा दावा केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT