Maharashtra Election: "चहावाले नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस मतांची भीख..."; अर्ज दाखल करताच अभिजीत बिचुकले कडाडले

मुंबई तक

Abhijeet Bichukale On Pm Narendra Modi And Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम येत्या 20 नोव्हेंबरला वाजणार आहेत. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे

ADVERTISEMENT

Abhijeet Bichukale On Satara Vidhansabha Election
Abhijeet Bichukale On Pm Narendra Modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिजीत बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद फडणवीसांवर केली टीका

point

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंनी 'या' मतदारसंघात अर्ज केला दाखल

point

अभिजीत बिचुकले माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले?

Abhijeet Bichukale On Pm Narendra Modi And Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम येत्या 20 नोव्हेंबरला वाजणार आहेत. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसच शिवसेना शिंदे गट, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर घटक पक्षांनी विधानसभेसाठी उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. अशातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

बिचुकले यांनी सातारा विधानसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात  निवडणूक लढवणार आहेत. मतदार संघासाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्यात निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विधानसभेसाठी आतापर्यंत चारवेळा बिचुकले यांनी अर्ज दाखल केला आहे.  

माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले काय म्हणाले?

"याठिकाणी 262 सातारा जावळी मतदारसंघातील मतदारांसाठी एक खूशखबरी आहे. मी स्वत: तुमच्यासाठी पुन्हा एकदा निवडणुकीला उभा राहत आहे. या तालुक्याचा काय विकास झाला? याचं तुम्ही आत्मचिंतन करा. राजकारणात काहीही होत असलं, स्थिरता असली, तरी अभिजीत बिचुकले ज्यावेळी उभा राहतो, तेव्हा तो कधीही माघार घेत नाही, हे लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी चाललं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून या देशात संपूर्ण राज्यात आणि देशात साता समुद्रापलीकडं बिग बॉसच्या माध्यमातून नाव कमावलं.

हे ही वाचा >> Prithvi Shaw चा खेळ खल्लास! मुंबईच्या स्टार फलंदाजाला रणजी ट्रॉफीतून का वगळलं? धक्कादायक कारण आलं समोर

माझा सडेतोड स्वभाव आहे, तसा स्वभाव इथल्या आमदारांचा आहे का? इथले विद्यमान आमदार कुणासाठी काम करतात? ते देवेंद्र फडणवीसांसाठी काम करतात. ते देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदींसाठी काम करतात. ही गोष्ट आत्मपरिक्षण करायची आहे. छत्रपतींचे वारस म्हणता तुम्ही स्वत:ला आणि काम कुणाच्या हाताखाली करता तुम्ही. चहावाले नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस स्वत: मतांची भीख मागायला नागपूरमध्ये फिरणार आहेत. अभिजीत बिचुकले हा स्वयंभू आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Weather : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! IMD कडून हाय अलर्ट

फक्त जनतेला एकच गोष्ट सांगू इच्छीतो की, तुम्ही जागृत व्हा. विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं मत कुठे विकू नका. खरोखर इतिहासा घडवायचा असेल, साताऱ्याचं नाव विधानभवनात खरोखर गाजवायचं असेल, तर माझा विजय तुम्ही निश्चित करा. कारण मी लोकशाही मानतो, अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp