Chandrashekhar Bawankule: "महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं आणि...", चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Chandrashekhar Bawankule Press Conference : मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंना ऑफर होती की, तुम्ही भाजपमध्ये पक्ष विलिन करा, याबाबत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज दिला आहे, यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.

ADVERTISEMENT

Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut
Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांवर निशाणा

point

"संजय राऊत खोटं बोलतात,त्यामुळे मी..."

point

संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule Press Conference : मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंना ऑफर होती की, तुम्ही भाजपमध्ये पक्ष विलिन करा, याबाबत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज दिला आहे,यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं आहे. तुम्ही का ऐकता, मला माहित नाही. दिवसभर ते खोटं बोलतात. त्यामुळे मी काही खोटेपणाचं उत्तर देणार नाही. त्यांना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. त्यामुळे माल त्यात इंटरेस्ट नाहीय". ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटला नाही, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, "36 पैकी 34 जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. दोनच जिल्हे शिल्लक राहिले आहेत. तो ही प्रश्न लवकरच सुटेल. या अधिवेशनात देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदाद बसतील. आमचे तिन्ही नेके एकत्र बसतील आणि निर्णय करतील".त्याठिकाणी सरकारचं पूर्ण लक्ष आहे. लवकरच त्या दोन्ही जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार आहे.  स्वारगेट बलात्काराची पूर्ण चौकशी तिथले पोलीस आयुक्त करत आहेत. देवेंद्रजी, अजितदाद स्वत: लक्ष देऊन आहेत. आमच्या सरकारने, पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. नियमाप्रमाणे आरोपीला योग्य शासन झालं पाहिजे, यासाठी आमची पोलीस यंत्रणा काम करत आहे.

हे ही वाचा >> Aditya Thackeray : "लाडक्या बहिणींना 2100 रुपये...", सरकारवर हल्लाबोल करत आदित्य ठाकरे काय म्हणाले?

प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश आज झाले. देविदासजी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण टीम भाजपमध्ये आली आहे. आमच्या नेत्या शोभाताई फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि आज हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं हुकूमशाहीचं धोरण सोडून मोदींजींच्या विकसित भारताला साथ देण्यासाठी आणि फडणवीस यांनी सुरु केलेल्या विकसित महाराष्ट्र संकल्पाला साथ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्रम्हपुरी विधानसभा याठिकाणी आली आहे. मी त्यांचा पक्ष प्रवेश केला आहे. देविदासजी बानबोले उत्तम कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी निश्चितपणे मजबूत होईल. आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की, महराष्ट्रातलं आणि देशातलं डबल इंजिन सरकार ब्रम्हपुरी विधानसभेच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

हे ही वाचा >> Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, सुरक्षारक्षकाला कॉलर धरून धक्काबुक्की, प्रकरण काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp