राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंग यांनी शिंदे-फडणवीसांचं ‘असं’ केलं स्वागत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (रविवारी) महाराष्ट्राचे मंत्री, आमदार-खासदारांसह अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचं दर्शन घेतलं.
ADVERTISEMENT
CM Eknath Shinde on Ayodhya Visit :
ADVERTISEMENT
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (रविवारी) महाराष्ट्राचे मंत्री, आमदार-खासदारांसह अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचं दर्शन घेतलं. तसंच राम मंदिरात महाआरतीही केली. त्यानंतर या नेत्यांनी नवीन राम मंदिराच्या सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. (BJP MP Brijbhushan Singh welcomes and felicitated CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis at Hanuman Gadhi temple in Ayodhya)
दरम्यान, यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी हनुमान गढी इथे शिंदे-फडणवीस यांचं जोरदार स्वागत आणि सत्कार केला. बृजभूषण सिंग यांनी हजारो कार्यकर्ते आणि साधू-महंतांच्यावतीने शाल, श्रीफळ, भव्य गदा आणि कलश देऊन शिंदे-फडणवीस यांचं स्वागत केलं. ते म्हणाले, आजपर्यंत असं स्वागतं हनुमान गढीमध्ये कोणाचंही झालेलं नाही. देव तुम्हाला शक्ती देवो. देशभरात भाजपची पताका फडकत राहो. तुमचंही नाव होतं राहो.
हे वाचलं का?
शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार? एकनाथ शिंदेंनी अयोध्येत दिलं उत्तर
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुमच्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो-कोटी भक्तांसाठी पाहिलेलं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत असल्यानं त्याचा आनंद आहे.आधी काही जणांना राम मंदीर फक्त स्वप्न वाटायचे. पण हे स्वप्न सत्यात उतरण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे, मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. महाराष्ट्रात आता प्रभू रामाच्या आशीर्वादाने बनलेले सरकार काम करत आहे. आमच्या सरकारमध्ये ना साधू कांड होईल ना गोर गरिबांवर अन्याय होईल.
‘साधू हत्याकांड आमच्या राज्यात होणार नाही’, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मी अयोध्येत आल्याचा मला आनंद आहे. तुम्ही अयोध्येच्या भूमीवर आमचं जे स्वागत झालं आहे, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर आयुष्यातील सगळे सुख मिळाल्यासारखं वाटतं आहे. जो राम जी की बात करेगा वही देश पे राज करेगा. महाराष्ट्रातही रामाला मानणारे सरकार काम करत आहे. यानंतर फडणवीस पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला जायचे असल्याचं सांगून भाषण आटोपतं घेतलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT