Chandrakant Patil : ''मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाही'', पाटलांचा नेमका रोख कुणावर?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chandrakant patil reaction pune fc road drugs video ajit pawar shambhuraj desai sushma andhare
चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवर भाष्य केले.
social share
google news

Chandrakant Patil on Pune Drugs Video : पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे.या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यानंतर आता या प्रकरणावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ''मी पालकमंत्री असताना अशा प्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत'', असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) नेमका रोख कुणावर आहे? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.( chandrakant patil reaction pune fc road drugs video ajit pawar shambhuraj desai sushma andhare) 

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवर भाष्य केले. ''मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाही'', असं चंद्रकांत पाटील यांनी बोलताना म्हटलं. मात्र, त्यानंतर त्यांनी या विधानावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा : Maharashtra Vidhan sabha : भाजप लढवणार 170 जागा? अजित पवार, शिंदेंना किती?

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ''अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी 14 लाख होती. आता 70 लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण , रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे'', असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. 

हे वाचलं का?

शंभूराजेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा 

पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडतेय. त्याही वेळेला जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे आढळायला लागले, तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई अरेरावीने बोलतात, त्यांना मला खास प्रश्न विचारायचाय, हप्ता भरपूर मिळाला की आम्ही तरुणांच्या जीवनाशी सुद्धा त्यांना खेळायचे. या सगळ्या प्रकरणांमध्ये शंभूराजे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय शंभूराजे देसाई यांच्यासाठी फक्त काम करणारे राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्याशिवाय पुणे सुधारू शकत नाही. असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : Murlidhar Mohol : "मुंडे साहेबांना आज खूप आनंद झाला असता", मोहोळ झाले भावूक

दरम्यान या सर्व प्रकरणावर शंभूराज देसाई यांनी सांगितले की, कल्याणीनगर प्रकरणानंतर आम्ही सर्व हॉटेल आणि पब यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यत जवळपास 60 जणांवर कारवाई केली. हा व्हिडिओ कुठल्या भागातील आहे, त्याची आम्ही चौकशी करणार आहे. 49 बार आणि पब बंद केलेली अजून सुरु केलेली नाहीत, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येईल, ज्या परिसरातील हॉटेलमध्ये हे घडलेय त्याबाबत कसून चौकशी करण्यात येईल, असेही देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT