Exclusive: 'तुमचा मंत्री माझ्या मुलाचं करिअर संपवतोय, तुझं ते माझ्या बापाचं हे चाललंय भाजपचं..', रामदास कदमांनी उडवून दिली खळबळ!

मुंबई तक

ADVERTISEMENT

रामदास कदमांनी उडवून दिली खळबळ!
रामदास कदमांनी उडवून दिली खळबळ!
social share
google news

Ramdas Kadam: मुंबई: शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे फायरब्रँड नेते रामदास कदम यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना भाजपवर तुफान हल्ला चढवला. 'भाजप मित्रपक्षांचं खच्चीकरण करत आहे. फडणवीस देखील डोळेझाक करतायेत.. हे मंत्रिमंडळ आमच्यामुळे बनलं पण तेच आता आमच्या मुळावर उठलंय..  तुझं ते माझंच.. माझं ते माझंच.. आणि तुझं ते माझ्या बापाचं हे भाजपचं चाललंय..' अशा शब्दात रामदास कदमांनी भाजपवर थेट नाव घेत टीका केली आहे. (exclusive shiv sena shinde group leader ramdas kadam sensational accusation against bjp on mumbai tak chavadi)

लोकसभा निवडणुकीपासूनच भाजप आणि शिंदे गटात सुंदोपसुंदी सुरू आहे. पण त्याला थेट वाचा फोडलीय ती रामदास कदम यांनी त्यांनी पहिल्यांदाच भाजपवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. वाचा नेमकं काय-काय म्हणाले रामदास कदम.

मुंबई Tak चावडीवर रामदास कदमांनी भाजपला सरळ सुनावलं..  

'कोकणामध्ये जो प्रयत्न उद्धव ठाकरेने माझ्या मुलाच्या बाबतीत केला होता तोच प्रयत्न आता माझ्या मुलाला संपवण्याचं काम भाजप करतंय आज.. हे वास्तव आहे.. मला आतली खदखद बाहेर काढायची होती.. भाजप हे मित्र पक्षाला कसं संपवतंय त्याचं जिवंत उदाहरण हे दापोलीचं आहे.. माझ्या मुलाच्या मतदारसंघातील...'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ramdas Kadam : ''उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना 'त्यासाठी' ब्लॅकमेलं केलं''

'जो अन्याय उद्धव ठाकरेंनी केला तोच अन्याय भाजपचा एक मंत्री आहे.. रवींद्र चव्हाण.. तो बांधकाम मंत्री आहे.. तो काय करतो.. तो दापोली मतदारसंघामध्ये जे विधानपरिषदेचे आमदार आहेत भाजपचे त्यांच्या नावाने बजेटमध्ये कामं घेतो दापोलीची.. स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून..'

'त्याची भूमिपूजनं ही ठाण्याचे कोण आमदार आहेत ना.. केळकर वैगरे.. त्यांना पाठवतो.. खरं तर हा हक्कभंग होतो.. स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून अशी भूमिपूजनं करता येत नाही. हक्कभंग होतो..' 

ADVERTISEMENT

'मी देवेंद्र फडणवीसांकडे गेलो.. त्यांना सांगितलं.. ते म्हणाले.. मी बोलतो ना भाई.. मी थांबवतो ना भाई.. मला तर संशय असा आहे की, देवेंद्र फडणवीस पण मी मारल्यासारखं करा तुम्ही रडल्यासारखं करा.. त्यांनी सांगितलंच नाही..'

ADVERTISEMENT

'ते पुन्हा सगळं बोर्ड वैगरे लावायला तयारी केली. मग माझ्यातील शिवसैनिक जागा झाला. मग म्हटलं आता बोर्ड लावले तर.. फोडा आणि जे भूमिपूजनाला येतील ना त्यांना झोडा.. होऊन जाऊ दे.. काय व्हायचं ते. हे केलं मी..  हे जेव्हा त्यांनी रात्री कळलं.. तेव्हा सकाळी कोणी आलं नाही..' 

'म्हटलं माझ्या नादाला कुठे लागता तुम्ही.. आठ दिवसाचं आधी उदाहरण देतो.. आता आम्ही निर्णय घेतला नसता तर हा कोण रवींद्र चव्हाण हा बांधकाम मंत्री झाला असता का? मंत्रिपद मिळालं असतं का? याची जाणीव त्याला हवी होती..'

हे ही वाचा>> 'त्या बेताल वक्तव्याची मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागावी', कोणी धाडली थेट नोटीस?

'एवढा मोठा निर्णय आम्ही घेतला.. आमच्यावर अनेक आरोप झाले ते सहन झाले. आमच्यामुळे मंत्रिमंडळ झालं. हा मंत्री बनला तो आमच्यामुळे बनला.. आणि आमच्या मुळावर उठलाय.' 

'कोकणात कुणबी समाज जास्त आहे. माझ्या मुलाने जाहीर सभेत सांगितलं होतं की, दापोलीत कुणबी समाजासाठी सभागृह बांधून देईल. मी योगेशला म्हटलं मुंबईतील प्रमुख लोकांकडून पैसे गोळा कर आणि खाजगी जागा घे विकत.' 

'तशा पद्धतीने योगेशने प्रयत्न केला आणि 1 कोटी जमा केले आणि 7 गुंठे जागा घेतली. ज्या दिवशी त्या जागेचं अॅग्रीमेंट होणार त्याच्या आदल्या रात्री या चव्हाणने अडीच कोटी पाठवले दापोलीत.' 

'7 गुंठे जागा घेऊ नका.. मी तुम्हाला 18 गुंठे जागा घेऊन देतो ती घ्या तुम्ही.. पण ते लोकं प्रामाणिक होते ते म्हणाले आम्हाला योगेशदादाने शब्द दिलाय. तुम्ही 20-25 गुंठे जागा दिली तरी ती आम्हाला नकोय. हही आताची गोष्ट आहे..' 

'देवेंद्र फडणवीस हे माहिती असून, अनेकदा सांगून देखील डोळेझाक केली जातेय.. आता कोकण पण आमचाच.. आणि गुहागर पण आमचाच..' 

'2009 ला गुहागरमधून मी उभा राहिलो तर मला पाडलं.. अनंत गीतेला सांगून.. 2014 ला आमचा भोसले म्हणून उमेदवार होता तो लढला.. 2014, 2019 आम्ही लढलोय. पण आता भाजपचा विनय नातू आहे तो लागला कामाला..' 

'रवींद्र चव्हाण माजी जिल्हाप्रमुखाला सांगतो की, यांना घेऊन कामाला लागा तुम्ही.. अरे तुमच्या बापाची जायदाद आहे का? गुहागर तुमचा कसा झाला लगेच?' 

'हे जे चाललंय.. तुझं ते माझंच.. माझं ते माझंच.. आणि तुझं ते माझ्या बापाचं हे भाजपचं चाललंय..' 

'हे मी दिल्लीपर्यंत पोहचवणार आहे. मी दिल्लीला पत्र लिहतोय. त्याची कॉपी मी तुम्हाला पाठवणार आहे. मोदी-शाहांना पत्र लिहतोय.. कशा पद्धतीने भाजपकडून आम्हालाच खच्ची करायचं काम चाललंय तुमच्या महाराष्ट्रातल्या.. यांना पायबंद घाला..' 

'नाहीतर आमच्या एकनाथ शिंदेंना मी दोन ओळीचं पत्र लिहीन.. मी राजीनामा देतोय.. घरी बसेन मी. शेवटी नाईलाजाने ती वेळ आमच्यावर येईल. असं होता कामा नये याची दक्षता दिल्लीने घ्यावी.' असं म्हणत रामदास कदमांनी मित्रपक्ष भाजपवर हल्ला चढवला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT