"आरोपींना कोर्टाकडून कठोर शिक्षा...", CM देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख हत्याप्रकरणी नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case:  "संतोष देशमुख प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयात खटला चालणार आहे. वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी केलं आहे."

ADVERTISEMENT

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case
CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्याप्रकरणावर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

point

"वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी केलं आहे, पोलिसांनी..."

point

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case:  "संतोष देशमुख प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयात खटला चालणार आहे. वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी केलं आहे, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेत आणि संपूर्ण पुराव्यासहीत दाखल केलेला आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की, ही केस त्यांनी फास्टट्रॅकवर चालवावी. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. मला विश्वास आहे जे आरोपी आहेत, त्यांना कोर्टाकडून कठोर शिक्षा देण्यात येईल", असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज महाराष्ट्र पोलीस परिषद पार पडली आहे. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाली. विशेषत: जे तीन नवे कायदे देशात तयार झालेले आहेत, त्या कायद्यांचं महाराष्ट्रातील अंमलबजावणी यांसदर्भातील सादरीकरण झालं. महाराष्ट्राने जो रोबोस्त प्लॅटफॉर्म तयार केला आहे, सायबर गुन्हे रोखण्यासाठी त्या संदर्भातील सादरीकरण झालं. महिलांवरील, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि अशाप्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तसच या गुन्ह्यांमध्ये वेळेत आरोपपत्र कसं जाईल, यासंदर्भात चर्चा झाली. याचसोबत ड्रग्जच्या संदर्भात कशाप्रकारची कारवाई चालली आहे आणि पुढे कशाप्रकारची कारवाई चाललेली आहे, पुढे कशाप्रकारची कारवाई केली पाहिजे, यासंदर्भातही चर्चा झाली".

हे ही वाचा >> वाल्मिक कराड म्हणालेला, 'जो आड येईल त्याला आडवा करा..' चार्जशीट जशीच्या तशी...

"उद्योगांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, या दृष्टीनं काय करता येईल, याबाबतही चर्चा झाली. या परिषदेत सांगितलं आहे की, ड्रग्जसंदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे. कोणताही पोलीस कोणत्याही रँकचा असो, हा जर ड्रग्जच्या प्रकरणाशी थेट सापडला, तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल, अशाप्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. महिलांवरील जे अत्याचार आहेत, त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं, याचं ट्रॅकिंग आम्ही करत आहोत. नवीन कायद्याने लोकांची जप्त झालेली संपत्ती असते, ती संपत्ती परत करता येईल, अशाप्रकारच्या तरतुदी तयार केलेल्या आहेत. मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे. याही दृष्टीने आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने जो नवीन कायदा केला आहे. त्यात शक्ती कायद्यातील अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा त्याचा रिव्ह्यूव घ्यावा लागेल आणि काय झालं नाहीय, त्या संदर्भातील कायदा करावा लागेल, असंही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा >> 'बीडचे कशाला प्रश्न विचारता.. पुण्याचे पत्रकार आहात तुम्ही', पंकजा मुंडे चिडल्या

हे वाचलं का?

    follow whatsapp