Devendra Fadnavis: "विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार घातला, पण त्यांना संधी...", CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
CM Devendra Fadnavis Press Conference: "राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्चला होणार आहे. विरोधी पक्षाने 9 पानाचं पत्र दिलं आहे, त्यात 9 नेत्यांची नावं आहेत. त्यातील दोन नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत".
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

"विरोधकांनी जे पत्र दिलं आहे, हे पत्र..."

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis Press Conference: "राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्चला होणार आहे. विरोधी पक्षाने 9 पानाचं पत्र दिलं आहे, त्यात 9 नेत्यांची नावं आहेत. त्यातील दोन नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत. एक नाव आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहे की नाहीयत..नसतील कदाचित, पण आमच्या ते लक्षात येत नाहीय. आम्ही ते शोधायला पाठवलेलं आहे. हम साथ साथ है, अशी परिस्थिती त्यांच्यात दिसत नाही. हम आपके है कौन, सारखीच परिस्थिती तिथे आहे. काँग्रेस तिथे पोहोचलीच नाही. रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केलीय. वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील नाहीत. कोणीच नाही...अशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललं आहे. चहापानावर त्यांनी बहिष्कार घातलाय. आता त्यांना ही संधी होती. जेव्हा नवीन सरकार बनतं, त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला एक सकारात्मक चर्चा आपण करुया. अशाप्रकारची संधी होती. त्यांनी संवाद स्थापीत करावा, असं पत्रकार परिषदेत म्हटलं. आम्ही त्यांना चहा पाण्याला निमंत्रित केलं होतं. म्हणजे संवादालाच निमंत्रीत केलं होतं. पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला", असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विरोधकांनी जे पत्र दिलं आहे, हे पत्र संपूर्णपणे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे. त्यांनी त्या बातम्यांसोबत सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता, तरी 9 पानाचं पत्र त्यांना अर्ध्या पानात निश्चितपणे देता आलं असतं. त्यांनी पुन्हा हे मुद्दे विधिमंडळात मांडले तर त्याची उत्तरं आम्ही द्यायला तयार आहोत. दोन महत्त्वाच्या चर्चा आपण या सभागृहात ठेवल्या आहेत. 8 मार्चला महिलादिन असल्याने सक्षमीकरणाचा जो मुद्दा आहे, त्या अर्थाने ही चर्चा सकारात्मक प्रकारची चर्चा आहे. भारतीय संविधानाचं अमृत मोहत्सवी वर्ष असल्याने आपण दोन दिवसाची चर्चा आयोजित केलंय".
हे ही वाचा >> Chandrashekhar Bawankule: "महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं आणि...", चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
"भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कशाप्रकारे विकास झाला, अशाप्रकारची सकारात्मक चर्चा व्हावी. माझी अपेक्षा आहे की, संविधान वाचवून किंवा त्यातील तरतुदी समजून विरोधी पक्षही त्यावर सकारात्मक चर्चा करेल. मी फाईल्सला स्थगिती दिलेली आहे, अशा बातम्या अलीकडच्या काळात आल्या आहेत. मग मला ऑफिसला विचारवं लागतं की स्थिगिती कधी दिली. मग ते सांगतात की आपल्याकडे अशी फाईलच आली नाही. मला मला शोधून काढावं लागतं. आमच्याकडे कोणत्याही आमदाराने काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल, तरी त्याच्यावर तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी", असं लिहितो.