Eknath Shinde : कुणाल कामरावर पहिल्यांदाच बोलले, एकनाथ शिंदे म्हणाले 'त्या' तोडफोडीचं समर्थन नाही, पण...
Kunal Kamra Controversy: एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कवितेनंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या या काव्यानं संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट जिथे शूट झालं होतं, तो हॅबिटॅट स्टुडिओ फोडला. या संपूर्ण घडामोडींवर शिंदे पहिल्यांदाच बोलले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कुणाल कामराच्या 'त्या' शब्दांवर पहिल्यांदाच बोलले शिंदे

शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीबद्दल काय म्हणाले शिंदे?

एकनाथ शिंदे यांनी कुणावर केले आरोप?
Eknath Shinde on Kunal Kamra : कुणाल कामरा या कॉमेडियनने विडंबनात्मक काव्य करत एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता निशाणा साधला होता. यावर काल एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा व्यक्त झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामराकडून अभिव्यक्तिच्या नावाखाली स्वैराचार, व्याभिचार आणि सुपारी घेऊन आरोप करण्याचं काम सुरू आहे असं म्हटलं आहे. (DCM Eknath Shinde on Kunal Kamra)
हे ही वाचा >> Nikhil Wagle : आधी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी माफी मागावी, 'त्या' हल्ल्याचा उल्लेख, वागळे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांना कुणाल कामराच्या त्या शब्दांबद्दल सवाल करण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले, "आरोपांवर मी बोलत नाही. अडीच वर्ष माझ्यावर आरोप झाले. मात्र, मी कामाने उत्तर दिलं. आरोपाला, आरोपांनी दिलं तर फोकस चेंज होतो. कामांनी उत्तर दिल्यामुळे जनतेनं आम्हाला पुन्हा निवडून दिलं. गद्दारी केली वगैरे लोक म्हणत होते. मात्र, 80 पैकी 60 जागा आम्ही जिंकलो." बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्या ठीके, मात्र त्याचा गैरफायदा घेऊन हा व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. विडंबन चालतं, ते कित्येक कविंनी केलंय. मात्र, या माणसाने माझ्यावर सोडाच, सुप्रीम कोर्टाचे चिफ जस्टीस, पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री निर्मला सितारमण, पत्रकारालाही विमानात भांडला, त्याला एअरलाईन्समधून बॅन केलंय असं शिंदे म्हणाले.
हे ही वाचा >> Kunal Kamra : वातावरण पेटल्यानंतर कुणाल कामराचं स्पष्टीकरण, शिंदेंना पुन्हा डिवचलं, अजितदादांच्या नावाचा...
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी असंही सांगितलं की, तोडफोडीचं समर्थन आम्ही करणार नाही. पण समोरच्यानेही आरोप करताना कुठल्या लेव्हलला आरोप करायचे हे पाहिलं पाहिजे. कार्यकर्ते संवेदनशील असतात. मी कधीही कुणावरही रिअॅक्ट होत नाही. मी शांतपणे काम करतो, लोकांना न्याय देतो.
कुणाल कामराचं स्पष्टीकरण....
"मनोरंजनाचा कार्यक्रम जिथे झाला (शुटींगचं ठिकाण) ते फक्त एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठीची ती जागा आहे.हॅबिटॅट (किंवा इतर कोणतेही ठिकाण) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. मी काय बोलतो किंवा करतो याचा त्यांच्याशी काहीही सबंध नाही, त्यांचं माझ्यावर नियंत्रणही नाही.तसाच कुठल्याही राजकीय पक्षाचाही यात संबंध नाही. विनोदी कलाकाराच्या शब्दांसाठी अशा सेटवर हल्ला करणे हे म्हणजे, निरर्थक आहे." असं म्हणत दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून कुणाल कामराने शिंदेंना पुन्हा डिवचलं आहे.