Assembly Election 2024: महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगुल वाजणार! थोड्याच वेळात तारखा होणार जाहीर
Maharashtra, Jharkhand Vidhansabha Election Dates : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल कधी वाजणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीची तारीख होणार जाहीर
आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आज दुपारी साडेतीनच्या नंतर आचार संहिता होणार लागू
Maharashtra, Jharkhand Vidhansabha Election Dates : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल कधी वाजणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात होते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रिय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौराही केला होता. अशातच आज मंगळवारी 15 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. दुपारी साडेतीन वाजल्यापासून ही आचारसंहिता सुरु होणार असून निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत्या माध्यमातून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची तारीख आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करणार आहे. निवडणूक आयोग अनेक राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेणार असल्याचं सूत्रांकडून समजते आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एक किंवा दोन टप्प्यांमध्ये मतदान होऊ शकतं.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: 'त्या' महिलांनाच मिळणार दिवाळी गिफ्ट! लाडक्या बहिणींच्या खात्यात किती रुपये जमा होणार?
तर झारखंडच्या विधानसभेच्या 81 जागांसाठी दोन किंवा तीन टप्प्यात मतदान होऊ शकतं. निवडणूक आयोग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदानाची घोषणा करू शकतं. तर मतमोजणी नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात होऊ शकते. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरला आणि झारखंडमध्ये पुढच्या वर्षी 5 जानेवारीला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Click here for Maharashtra Election 2024 Date Live Updates
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग सण उत्सवांचा विचार करून तारखा जाहीर करणार आहे. 29 ऑक्टोबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीचा सण आहे. तर 6 नोव्हेंबरपर्यंत छठपूजा साजरी केली जाणार आहे. तसच देव दिवाळीही नोव्हेंबर महिन्यातच आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी निवडणुकीच्या तारखा घोषित करू शकतं.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: सोसाट्याचा वारा अन् मुसळधार! राज्यातील 'या' भागांना पाऊस झोडपणार
महाराष्ट्रात विधानसभेची मागील निवडणूक 21 ऑक्टोबर 2019 ला झाली होती. एकाच टप्प्यात सर्व 288 जागांसाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीत जवळपास 61.4 टक्के मतदान झालं होतं. याचसोबत 24 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला होता. झारखंडमध्ये 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल पाच टप्प्यात पार पडला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT