Suresh Lad : शरद पवारांना कोकणात धक्का! दोन वेळा आमदार राहिलेला नेताच भाजपात

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

suresh lad quit sharad pawar's ncp
suresh lad quit sharad pawar's ncp
social share
google news

Suresh Lad latest News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या नेत्यानेच आता भाजपत उडी मारली. तीन वेळा कर्जत-खालापूर मतदारसंघातून आमदार राहिलेल्या सुरेश लाड यांनी देवेंद्र फडणवीस-चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. अजित पवार गटात न जाता, सुरेश लाडांनी भाजपत जाण्याचा निर्णय का घेतला, याबद्दलही आता माहिती समोर आलीये.

2019 पर्यंत कर्जत-खालापूरचे आमदार असलेले आमदार सुरेश खाडेंनी भाजपत प्रवेश करत शरद पवारांना धक्का दिला. तीन वेळा आमदार राहिलेल्या माजी आमदार सुरेश लाड यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.

नाराजीनाट्य… राजीनामा

सुरेश लाड यांची पहिल्यांदा जाहीरपणे नाराजी समोर आली ती २०२१ मध्ये. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोकण दौरा सुरू असतानाच सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, सुनील तटकरेंनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर २०२२ मध्येही त्यांनी जयंत पाटील रायगड दौऱ्यावर असताना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आणि मधुकर पाटलांवर जबाबदारी सोपवली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘मुंबईची लूट अहमदाबाद, दिल्लीच्या आदेशावरून’, आदित्य ठाकरे प्रचंड चिडले!

पराभवामागे सुनील तटकरे

सुरेश लाड हे कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग दोन वेळा आमदार होते. 2009, 2014 मध्ये आमदार झाल्यानंतर 2019 मध्ये मात्र, त्यांना परावभवाचा धक्का बसला. शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंनी कर्जत-खालापूरमध्ये त्यांना पराभूत केले. हा पराभव लाडांच्या जिव्हारी लागला होता. या पराभवामागे अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे असल्याचेही लाड यांनी अनेक बोलून दाखवले होते. दुसरीकडे तटकरे हे सुधाकर घारे यांना ताकद देत असल्यानेही ते नाराज होते.

हेही वाचा >> ‘तुम्ही विचार करायचा होता ना?’, जरांगे पाटलांनी पकडलं कात्रीत

कोंढाणे धरणाचे पाणी कर्जतला मिळावे, या मागणीसाठीही ते अग्रही होते. दोन वर्ष त्यांनी ही मागणी केली मात्र, तत्कालिन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निर्णयच घेतला नाही. त्यामुळेही त्यांच्या नाराजीत भर पडली. सुरेश लाड हे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज होते.

ADVERTISEMENT

पवारांना सोडलं, अजित पवारांना का नाकारलं?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेते अजित पवार गटात सामील झाले. पण, सुरेश लाड यांनी अजित पवार गटात जाणं टाळलं. कधी काळी सुनील तटकरेंच्या जवळचे मानले जाणारे लाड नंतरच्या काळात त्यांचापासून दूर गेले. तटकरेंविरुद्धची नाराजी त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली. त्यामुळे अजित पवारांसोबत जाणे त्यांनी टाळलं. विधानसभा निवडणूक लढवण्याची लाड यांची इच्छा आहे. त्यामुळे ते संधीच्या शोधात होते. लाड यांनी भाजपत जाण्याचा मार्ग स्वीकारल्याचे म्हटले जात आहे. सुरेश लाड हे पक्षात आल्याने भाजपकडूनही कर्जत-खालापूर मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT