Gajanan Kirtikar : 'आता ईडीचे प्रयोग थांबवा', शिंदेंचा नेता भाजपवर इतका भडकला?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

ईडीच्या कारवायांवरून गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडे बोट दाखवलं आहे.
गजानन कीर्तिकर यांनी ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांवर टीका केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विरोधकांवर ईडीच्या कारवाया संशयाच्या भोवऱ्यात

point

मुंबई महापालिका खिचडी घोटाळ्यावरून गजानन कीर्तिकरांचे भाजपला खडेबोल

point

अमोल कीर्तिकर यांच्यासाठी गजानन कीर्तिकर धावले

Gajanan Kirtikar, Amol Kirtikar : लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कीर्तिकरांची सुरू झालेल्या ईडीची कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या गजानन कीर्तिकरांनीच याबद्दल स्फोटक भाष्य केले आहे. 'चौकशी झालेली असतानाही पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारून अटक होईल असं टेन्शन सतत डोक्यात निर्माण केले जात आहे', असे म्हणत कीर्तिकरांनी या संपूर्ण कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Gajanan Kirtikar Says, BJP Should be Stopped ED Inquiry against opposition)

ADVERTISEMENT

गजानन कीर्तिकरांचे स्फोटकं विधाने, काय काय बोलले? 

1) "मी आता उत्तर पश्चिम मुंबईचा खासदार आहे. मी निवडणूक लढवत नाही, हेही जाहीर केले आहे. उत्तर पश्चिम मधून उबाठा उमेदवार अमोल कीर्तिकर आहे. आमच्या शिवसेनेचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे. त्या उमेदवारासाठी ताकदीने उभ राहून त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे." 

2) "मी तीन वेळा मी युतीतून खासदार झालोय, याची जाणीव आहे. त्यामुळे युती धर्म मी पूर्णपणे पाळलेला आहे. दिल्लीत खासदार असताना महत्त्वाची स्थित्यतंरे बघायला मिळाली. कलम ३७० हटवलं, जीएसटी आणलं, तिहेरी तलाक हटवलं, राम मंदिर बनवलं, जी २० चं अध्यक्षपद, भारतीय दंड विधान यामध्ये सुधारणा केली." 

हे वाचलं का?

3) "मोदी आणखी दहा वर्षे भारताचे पंतप्रधान राहावे, अशी आमचीही इच्छा आहे. पण, प्रश्न असा आहे की, देशातील जनता मोदींच्या पाठीशी उभी राहणार आहे. हे जरी सत्य असलं, तरी आज चारशे पारचा जो नारा लावला आहे, त्यात असा दर्प येता कामा नये. दर्प जो आहे, तो मोदी किंवा शाहांचा नाहीये. भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे."

हेही वाचा >> 'मी महाराष्ट्रातलं चित्र बदलून दाखवीन...', शरद पवारांनी पुन्हा ठोकला शड्डू! 

4) "रामदास आठवले यांची आंबेडकरी जनता युतीला मतदान करते. त्यांचा एकही उमेदवार रिंगणात नाही. त्यांचा युतीत खारीचा वाटा आहे. त्याचप्रमाणे शिवसेना. शिवसेनेची व्होटबँक या महाराष्ट्रात आहे. बाळासाहेबांनी जे विचार पेरले, त्या विचारांनी प्रेरित झालेले तरूण महाराष्ट्रात आहे. शिवसेनेची मोठी व्होटबँक महाराष्ट्रात आहे. त्याचा फायदा युतीच्या उमेदवारांना होतो." 

ADVERTISEMENT

5) "ईडीबद्दल माझं स्पष्ट मत आहे की, आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही. एवढा भक्कम पाठिंबा देशात भाजपला आहे. ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे. लोक ईडीच्या अशा प्रकारच्या कारवाईला कंटाळले आहेत. त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे." 

ADVERTISEMENT

6) "मला या गोष्टीचा राग येतो. अमोलवरती किंवा सूरज चव्हाणवरती... खिचडी घोटाळ्या संदर्भात त्यांच्यावर आरोप आहेत. देशामध्ये व्यवसाय चालतो. देशामध्ये व्हेंडर्स असतात. कोरोना आला. जम्बो हॉस्पिटलची संकल्पना आली. सर्व काही तत्काळ हवं होतं. सगळ्या गोष्टींची गरज होती. ती गरज भागवण्यासाठी पुष्कळ व्हेंडर्स आले."

हेही वाचा >> शरद पवारांचं बोलणं मला बिलकुल आवडलेलं नाहीये -अंजली दमानिया 

7) "रुग्णांना खिचडी खाऊ घालण्यासाठी व्हेडर्संची गरज होती. संजय माशेलकर जे आहेत, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. संजय माशेलकर हे आमच्या शिवसेनेचे सचिव आहेत. त्यांच्या जोडीला सूरज चव्हाण, अमोल सप्लाय चेनमध्ये मदत करत होते. सामाजिक भावनेतून ते केलेलं आहे." 

8) "संजय माशेलकरची जी कंपनी आहे, त्यात सूरज किंवा अमोल भागीदार नाहीत. त्यांनी जीवावर उदार होऊन त्यांनी सप्लाय चेनमध्ये काम केलं. त्या कंपनीला नफा झाला आणि त्यानंतर ज्याला मानधन म्हणतात ते अमोलला आणि सूरज चव्हाणला मिळालं. चेकने ते पैसे बँकेत टाकलं. त्यावर आयकर देखील लागला. याच्यामध्ये मनी लाँड्रिंग नाही. यामध्ये फसगत नाही." 

9) "देशात, महाराष्ट्रात, मुंबईत जे व्यवसाय चालतात, त्यापैकी तो एक व्यवसाय होता. यामध्ये घोटाळा वगैरे जे म्हटलं जातं ते एकदम चुकीचे आहे. या संदर्भात सगळी कागदपत्रं... ईडीने याचा पूर्ण तपास केलेला आहे. हा काही गुन्हेगारी गुन्हा नाही. याला कोठडीची गरज नाही, पण सतत डोक्यावर टेन्शन ठेवायचं की, अटक केली जाईन."

हेही वाचा >> "थेट वंशज आहात, हे सिद्ध करा", मंडलिकांचं शाहू महाराजांना चॅलेंज 

10) "परवा त्याला बोलावलं. जे मागच्या वेळी विचारलं, तेच परत विचारलं. तिच कागदपत्रं तपासली. खरंतर चौकशी संपलेली आहे. पण, चौकशी करत आहेत. टेन्शन देण्याचं काम चाललं आहे. म्हणून म्हटलं हे सगळे प्रयोग बंद करा, अशी माझी विनंती आहे."

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT