Ajit Pawar: '…तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही', सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी अजित पवारांचा नवा डाव
Ajit Pawar Baramati: लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार निवडून दिला नाही तर आपण बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही.. असा थेट इशाराच अजित पवार यांनी बारामतीच्या मतदारांना दिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित पवारांचां बारामतीकरांना खुलं आवाहन
लोकसभेत अजित पवारांना विजय हवा
विधानसभा बारामतीतून न लढवण्याचा इशारा
Ajit Pawar Baramati Loksabha Election: बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. 'बारामती लोकसभा निवडणुकीत आपल्या विचाराचा उमेदवार विजयी झाला तरच इथून विधानसभा निवडणूक लढवणार, नाहीतर..' असं थेट विधान अजित पवार यांनी जाहीर सभेत केलं. ते बारामतीत बोलत होते. (if our candidate here is not elected to the lok sabha i will not contest assembly elections from baramati ajit pawar made a new move to defeat supriya sule)
ADVERTISEMENT
बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा पारंपारिक बालेकिल्ला आहे, मात्र आता तिथे उमेदवार उभा करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> शिव्या,आरोप.. राणेंचं अत्यंत वादग्रस्त भाषण जसंच्या तसं
बारामतीच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला आवाहन करताना असं म्हटलं की, 'महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आणि निवडणुकीच्या प्रारंभापासून आजपर्यंत विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जमा झाले नाही असे बारामतीत कधीच घडले नाही. याचा मला अभिमान आहे. पण जर लोकसभेत आपला उमेदवार निवडून आला तरच आपण विधानसभेसाठी इथून निवडणूक लढवू.'
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘…तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहीन..’, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'मी आपल्याला सांगतो की, यावेळी नेहमी सारखी परिस्थिती नाही.. काही जणांचा जीव हा वरिष्ठांवर राहणार. कामाचा माणूस म्हटलं तर माझ्यावर पण तुमचं प्रेम आहे. आता काय करायचं.. त्याच्या संदर्भात केंद्रातील योजना आणायचं म्हटल्यावर तर केंद्रामध्ये केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे. जर खासदार विरोधी पक्षाचा निवडून गेला तर काही काम करू शकत नाही. भाषणं करू शकतो. खोटं नाही सांगत..'
'जसं एक वर्ष आपली सत्ता नव्हती.. त्यावेळेस बऱ्याच अडचणी यायच्या, अनेक कामाची गती मंदावली होती. बऱ्याचदा तुम्ही सगळे लोकं निवदेन द्यायचे.. मी प्रयत्न करायचो पण अडचणी यायच्या.. शेवटी प्रत्येकाचा काळ असतो. त्या काळातच कामं होतात. त्यामुळे ही कामं करायचं म्हटलं तर माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे की, आता एकंदरित सकाळीपण सांगितलं..'
'अलीकडे आमचे वरिष्ठ यांचा घरामध्ये थोडा आदर असल्यामुळे उद्या मी उभ्या केलेल्या उमेदवाराला मी आणि माझ्या घरातील दोन-चार लोकं सोडले तर त्यांचा कोणी प्रचार करणार नाही. माझा पवार परिवार हा माझ्या उलटा प्रचार करणार.. आता माझा परिवार हा सगळा आहे. त्यांनी उलटा प्रचार केला.. म्हणजे मी आज 30-32 वर्ष घासली..'
'एकंदरीत ही परिस्थिती आहे. काही जणं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. काही जण आणखी काही सांगतील. मी आपल्याला सांगतो की, बारामतीकरांना मी उभ्या केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल. कारण आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व मी करतोय. राज्यात देखील मी पुढाकार घेतोय..'
ADVERTISEMENT
'माझी तुम्हाला विनंती आहे की, शेवटी माझ्या विचाराचा खासदार हा चांगल्या मताधिक्याने आला पाहिजे. काम होण्याकरिता तुम्हाला मतदान करायचं की, काम न होण्याकरिता मतदान करायचं..'
'अहो आज तर कहर केला.. चूक झाली त्यांची.. (सुप्रिया सुळे)परंतु आपला एक कार्यकर्ता आहे.. त्याची आई वारली. त्यांनी सांगितलं की, तो कार्यकर्ताच वारला.. मी सकाळीच त्याला भेटून आलो.. ते म्हटले राजेंद्र झगडेंच्या दु:खद निधनानिमित्त मी त्याला भेटायला गेले. अरे असं नका करू.. कारण १५ ते १७ वर्ष आम्हीच तिथे कामं केली आहेत.'
ADVERTISEMENT
'मी माझ्या १९९१ ते २०२४ या कालावधीत किती कामं केली आणि मागच्या काळात किती कामं झाली.. बारामतीचा कायापालट केव्हा झाला.. बारामती खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने घोडदौड कधी सुरू झाली.. या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा..'
'कामामध्ये आजच्या घडीला माझी बरोबरी करणारा कोणी नाही.. पण तुम्ही मला साथ दिली पाहिजे. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे.. मी पण शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.'
'माझी बारामतीकरांना विनंती आहे की, आम्ही ज्या उमेदवाराला खासदारकीसाठी उभं करू त्याला तुम्ही विजयी केलं पाहिजे. तर मी पुढे विधानसभेला उभा राहील. खरं सांगतो.. मी नाही तर खुशाल... तुम्ही जर मला साथच देणार नसतील तर मला प्रपंच आहे. मी कशाला यात पडू..'
'कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे. कारण मी इतकं जर काम करुन.. कारण वेगवेगळे मान्यवर येतील, भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भावनिक व्हायचंय की, तालुक्याचा चाललेल्या विकासाची गती अशीच ठेवायची आहे? हे तुम्ही ठरवायचं आहे.'
'तुम्हाला असाच जर बारामतीचा विकास सुरू ठेवायचा असेल.. मित्रांनो तुम्ही म्हणाल काय उर्मटसारखा बोलतो.. पण माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही.. पण तुम्ही जर ठरवलं आता याचं बास झालं तर बास... आपलं काही म्हणणं नाही.. पण परत तुम्ही किती सांगितलं.. तर मी अतिशय हट्टी माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या पद्धतीने पुढच्या गोष्टी करणार.. ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्या.'
'तुम्ही आपल्या विचाराचा खासदार आणा.. मी असं रेल्वे स्टेशन करून टाकेन की, तुम्ही म्हणाल काय केलं याने.. म्हणजे मी फक्त बोलत नाही तर कृती करतो.'
'इथे मंदिर आहे.. त्या मंदिराच्या साक्षीने सांगतो की, इथे जो उमेदवार मी उभा करेन तो पाचही तालुक्यात लीडवर असेल. आता मलाही बघायचंय.. कारण आता बारामतीची कसोटी आहे. बारामतीकर विकासाच्या मुद्दयावर पाठिशी उभे राहतात की, भावनिक मुद्दयाच्या.. हे मी येत्या निवडणुकीत बघणार आहे.'
'तुम्ही म्हणाल की, अजित तू फक्त बोलतोय.. पण उमेदवार कोण? ते तर सांग.. उमेदवार जोपर्यंत आमची महायुती एकत्र बसून कुठल्या जागा कोणा-कोणाला हे ठरवत नाही तोपर्यंत मला उमेदवार जाहीर करता येत नाही. ज्यांना माझ्यासोबत राहायचंय त्यांनी खुलेपणाने राहा.. दबावाने कोणी बरोबर राहू नका.. पण पुढे कधी तरी त्यांना अजित पवारची गरज लागेल.. तेव्हा त्यांना सांगतो कसा आहे अजित पवार.. तेव्हा काय सोडणार नाही..'
'मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो.. मी घरातलाच आहे ना.. वरिष्ठ म्हणत होते सुप्रियाला अध्यक्ष करा.. सुप्रियाला केलं काय अन् अजित झाला काय.. एकच आहे ना.. जर तुम्ही घर एक समजता तर.. मी अनंतरावांच्या पोटी आलो म्हणून मी अध्यक्ष नको का? आता कोणाच्या पोटी कोणी यायचं हे काय माझ्या हातात आहे?'
'आता हे जे काही सुरू आहे त्यात समजा माझ्या बाकीच्या परिवाराने एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये एवढी विनंती..' असं अजित पवार यावेळी म्हणाले.
आता अजित पवारांच्या या नव्या डावानंतर शरद पवार नेमका कोणता डाव टाकणार आणि बारामतीकरांना आपल्या बाजूने कसं वळवणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT