Maratha Reservation : 'शिवरायांच्या नावाने खोटं बोलू नका', आव्हाडांनी CM शिंदेंना सुनावलं
Jitendra Awhad Criticize Eknath Shinde, Maratha Reservation : या विधेयकावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका', अशी टीका आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मराठा आरक्षणावरून सरकार वेळ मारून नेतंय
मुख्यमंत्री शपथ पूर्ण न करताच स्वत:ची पाठ थोपटतायत
जितेंद्र आव्हाड शिंदे सरकारवर भडकले
Jitendra Awhad Criticize Eknath Shinde, Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक विधानसभेच्या पटलावर सादर केले होते. हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले. त्यानंतर विधानपरीषदेत हे विधेयक एकमताने मंजूर झाले. या विधेयकावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका', अशी टीका आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. (jitendra awhad criticize cm eknath shinde maratha reservation spcial session manoj jarange patil)
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाडांच ट्विट जसंच्या तसं
''मुख्यमंत्री साहेब,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!''
''मराठा आरक्षणावरून गेले अनेक महिने सरकार फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे.आरक्षणाला आमचा विरोध नाही.त्यामुळे सरकारने याविषयीच्या कोणत्याही निर्णयात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही.आरक्षणाचा निर्णय हा सर्वपक्षीय एकमतानेच झालेला निर्णय असेल,हे लक्षात असू द्या.''
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Manoj Jarange : 'तुम्ही किती दिवस फसवणार?'
''मुंबईच्या मोर्च्यात 'सगेसोयऱ्यां'वरून दिलेल्या शब्दाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.ज्यांच्या नोंदीच सापडलेल्या नाहीत त्यांचं आरक्षण मराठा समाजावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय.सरकार यासाठी वेळकाढूपणा का करतंय?''
ADVERTISEMENT
''मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली असली तरी ते कायद्याच्या कसोटीवर कितपत उतरेल आणि मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का..? यात शंकाच आहे.''
ADVERTISEMENT
''वाईट तर याचं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि शपथ पूर्ण न करताच स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत.मराठा आरक्षण जोवर कायद्याच्या कसोटीवर खरे उतरत नाही आणि ते प्रत्यक्षात लागू होत नाही,तोवर या शपथेचं ओझं मुख्यमंत्र्याना वाहावे लागेल,हे लक्षात असू द्या.''
'याला फसवणूकच म्हणतात', जरांगे सरकारवर भडकले
'याला फसवणूकच म्हटलं जातं, किती दिवस फसवणूक करणार तुम्ही, तुम्ही अधिसूचना काढली आणि तिची अंमलबजावणी करणार नाही. हे कुठे शक्य आहे. अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही? मग अधिसूचना काढलीच कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं, मग अधिसूचना काढली कशाला? असे सवाल देखील जरांगेंनी सरकारला केले आहेत.
हे ही वाचा : 'जरांगे महाराष्ट्राच्या CM, DCM ला देतात आईवरून शिव्या'
आम्हाला सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. त्याचच आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेले आहे. आमच्या सगे सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही ? अधिवेशन घेतलं कशाला, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.तसेच अधिवेशन हे गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे, करोडोंच्या संख्येने लोक एकत्र आलेली आहेत, त्यासाठी अधिवेशन बोलावल आहे. पण अधिवेशनाचा फायदाच होणार नसेल तर अधिवेशन घेतलचं कशाला? गोरगरीब मराठ्यांच वाटोळ करायला...,अशी टीका देखील जरांगेंनी सरकारवर केली.
ADVERTISEMENT