Dilip walse Patil : ‘बरे झाले मनातील विष बाहेर पडतेय’, जितेंद्र आव्हाड भडकले
दिलीप वळसे-पाटील शरद पवार न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली. वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केलेत.
ADVERTISEMENT

Jitendra Awhad Dilip Walse Patil Sharad Pawar : अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांवर हल्ला चढवला. स्वबळावर मुख्यमंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करत वळसे-पाटलांनी पवारांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलेत. दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या विधानानंतर शरद पवार समर्थक जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले. ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी वळसे-पाटलांना इशारा दिला.
दिलीप वळसे-पाटलांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलीये. शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात असलेलं विष बाहेर पडतंय, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
शरद पवार विरुद्ध दिलीप वळसे-पाटील : आव्हाड काय म्हणाले?
ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणालेत, ‘हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा (शरद पवार) सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते”, असे म्हणत आव्हाडांनी दिलीप वळसे-पाटलांना सुनावलंय.
वाचा >> Dilip Walse Patil : पहिला वार! शरद पवारांची वळसे-पाटलांनी काढली ‘उंची’
आमदार आव्हाड पुढे म्हणालेत की, “साहेबांनी (शरद पवार) घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदारसंघात आमदार नाही निवडून आणू शकले. वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही; पण आदरणीय साहेबांसाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब (शरद पवार) मात्र कायमच रिते राहिले”, अशी खंत आव्हाडांनी वळसेंच्या विधानावर व्यक्त केली.
वाचा >> Sharad Pawar: ‘ईडीच्या भीतीने तिकडे गेले, आता म्हणतात राष्ट्रवादी…’, शरद पवारांनी सुनावलं
“बरे झाले साहेबांविषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही. क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल”, असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे-पाटील यांना दिला आहे.
हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी… pic.twitter.com/ApxgzcvTuJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 20, 2023
दिलीप वळसे-पाटलांच विधान काय होतं?
शरद पवारांच्या नेतृत्वाबद्दल दिलीप वळसे-पाटील असे म्हणालेले की, “आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की, आज आपण पाहिलं तर शरद पवार यांच्या उंचीचा दुसरा नेता देशामध्ये नाही, असं आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या एकट्याच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही त्यांना बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही.”
जोडे मारो आंदोलन
शरद पवारांवर टीका करताना दिलीप वळसे-पाटलांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस वळसे-पाटलांविरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे.