‘तुमचं रॉकेट कोणत्या जागेत घालेन…’, कल्याणमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष पेटला!
Bjp Vs Shivsena : कल्याणमध्ये आता भाजप आणि शिवसेनेचा वाद टोकाला पोहचला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी रॉकेटवरून शिवसेनेवर केलेल्या टिकेला शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आता शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार युद्ध रंगणार असल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
Bjp Vs Shivsena : कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटापुढे भाजपचं काहीच चालत नसल्याचा आरोप भाजपचे (BJP) स्थानिक आमदार गणपत गायकवाड (Ganpat gaikwad) यांनी केला होता. त्यामुळे आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या आरोपानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटातील शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता कल्याण मतदार संघात गायकवाड विरुद्ध गायकवाड यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. (shivsena city chief mahesh gaikwad criticizes bjp mla ganpat gaikwad kalyan constituency)
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या गुंडांना चार चार पोलीस
आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हणाले होते की, त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट असल्याची टीका केली होती. तसेच मला छेडण्याचा प्रयत्न केला गेला तर मी नाव घेऊन सांगेन असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. त्याचबरोबर माझ्या निधीच्या फाईल्स कोणाच्या टेबलखाली दाबून ठेवल्या आहेत हेही मला माहिती आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे पोलिसांवर ताण आहे. पोलिसांची मदतही जनतेला मिळाली पाहिजे. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गुंडांना चार चार पोलिसांचा बंदोबस्त दिला जात असल्याची टीकाही भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती केली होती.
हे ही वाचा >> Special Parliament Session : मोदीजींना हात जोडून विनंती, सुप्रिया सुळेंनी भाजपला पुन्हा घेरलं
धनुष्यबाणावर टीका करु नका
आमदार गणपत गायकवाड यांनी टीका केल्या नंतर आता शिंदे गटातील शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी त्यांना थेट इशारा देत धनुष्यबाणावर टीका करु नका कारण तुमचे रॉकेट कोणत्या जागेत घालेल हे सांगता येणार नाही अशी बोचरी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे
महेश गायकवाड यांनी त्यांच्यावर पलटवार करताना आम्हाला गुंड म्हणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या मुलांनाही पोलीस संरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे नकोस त्या गोष्टींवरून आमदार गणपत गायकवाड हे युतीत मिठाचा खडा टाकण्याचेच काम करीत आहेत असल्याची टीका त्यांनी केली आहे. आम्ही यूती धर्म पाळतो. भाजप आमदारांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करा असे पलटवारही महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्यावर केली आहे.
हे ही वाचा >> Shiv Sena MLAs : ‘ते काम आमचं की विधानसभा अध्यक्षांचं?’ ठाकरेंचा कोर्टात खडा सवाल
महापौर भाजपाचाच होणार
कल्याण डोंबिवली महापालिकेत २०१९ साली भाजपाचा महापौर होणार हे ठरलं होतं, मात्र गडबड सगळी मातोश्री वरून होते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मला सांगितल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले. भाजपचा महापौर व्हावा अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. मात्र मातोश्रीवरून सांगितलं की भाजपाचा महापौर नको आणि त्यामुळे 2019 साली भाजपाचा महापौर झाला नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला जागणारे आहेत, त्यामुळे शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये यावेळेस महापौर हा भाजपाचाच होणार असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ रवींद्र चव्हाण यांनी बोलून दाखवल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT