Ladki Bahin Yojana : फडणवीसांनी सांगितलं फॉर्म रिजेक्ट होण्याचं मोठं कारण
Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रम पुण्यात पार पडला आहे. या कार्यक्रमातून बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपलं सरकार हे देना बँक सरकार आहे, लेना बँक सरकार नाही आहे, वसूली सरकार नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आपलं सरकार हे देना बँक सरकार, लेना बँक सरकार नाही
तुमच्या सावत्र भावांच्या पोटात खूप दुखायला लागलं.
सावत्र भावाने योजना बंद व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले.
Devendra Fadnavis on Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्यांपैकी अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे नेमके या महिलांचे अर्ज रिजेक्ट का झाले? याचे मोठं कारण आता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. त्याचसोबत फडणवीसांनी विरोधकांवर देखील हल्ला चढवला आहे. (ladki bahin yojana devendra fadnavis criticize oppositio leader maha vikas aghadi mukhymantri majhi ladki bahin yojana scheme pune sabha)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम पुण्यात पार पडला आहे. या कार्यक्रमातून बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपलं सरकार हे देना बँक सरकार आहे, लेना बँक सरकार नाही आहे, वसूली सरकार नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला. सप्टेंबरमध्ये ही ज्यांचे अर्ज येतील त्यांनाही पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ही खटाखट योजना नाही, फटाफट योजना आहे, असा चिमटा देखील फडणवीसांनी काँग्रेसला काढला.
हे ही वाचा : Ajit Pawar : ''अरे शहाण्यांनो...'', अजित पवारांनी विरोधकांना भरला दम
आम्ही योजनेची घोषणा केल्यानंतर तुमच्या सावत्र भावांच्या पोटात खूप दुखायला लागलं. मग सावत्र भावाने योजना बंद व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले. पहिल्यांदा कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि पुरूषांचे फोटो लावले. जेणेकरून महिलांना सांगता येईल, तुमचे अर्ज भरलेत,पण सरकारने ते स्विकारले नाहीत. काही ठिकाणी मोटरसायकल, तर काही ठिकाणी बागेचे फोटो लावले. जेणेकरून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे आणि महिलांपर्यत पैसे पोहौचू नये असा आरोप फडणवीसांनी विरोधकांवर केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आपल्या पोर्टलवर जंग डेटा विरोधकांनी टाकला. जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे. हे पोर्टल बंद पडलं पाहिजे. मध्ये 4-5 दिवसं पोर्टल बंद होतं.मग या लोकांनी हाहाकार सुरु केला.पण तुम्ही काळजी करू नका. पोर्टल बंद पडलं तरी आम्ही ऑफलाईन फॉर्म स्विकारले आणि पुन्हा पोर्टलवर आणले आणि महिलांना पैसे देण्याचा निर्धार आम्ही पूर्ण केला असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
हे ही वाचा : Gold Price Today : बाई...इतकं महाग झालं सोनं, रक्षाबंधनापूर्वी सोन्याचा भाव काय?
फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला
1500 रूपयात महिलांना विकत घेता का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला केला होता. या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले, अरे नालायकांनो आईचं आणि बहिणीचं प्रेम हे जगातली कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही.हे प्रेम अनमोल आणि बहुमोल असतं. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे लोकं जन्माला आले त्यांना 1500 रूपयाचे मोल कधीच कळणार नाही, अशी टीका फडणवीसांनी सुप्रिया सुळेंवर केली.
ADVERTISEMENT
विरोधक आरोप करतात दोन-तीन महिने पैसे मिळणार, मग पैसे मिळणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो, अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्चपर्यंतची सगळी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला तर पुढच्या मार्चपर्यंतची व्यवस्था करणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT