MNS: 'कुंभमेळ्याला गेलेले लाखो लोक...', राज ठाकरेंची पुन्हा एकदा तुफान टीका

मुंबई तक

Raj Thackeray criticizes Ganga river pollution: गंगा नदीचं प्रदूषण आणि कुंभमेळ्यातील अस्वच्छता यावरून राज ठाकरेंनी त्यांच्या गुढी पाडवा मेळाव्यात जोरदार टीका केली आहे. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

कुंभमेळ्यावरून राज ठाकरेंची पुन्हा एकदा तुफान टीका
कुंभमेळ्यावरून राज ठाकरेंची पुन्हा एकदा तुफान टीका
social share
google news

Raj Thackeray: मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (30 मार्च) मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत कुंभमेळ्याबाबत सडेतोड विधान केले. त्यांनी गंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत कुंभमेळ्यातील पाण्याच्या दूषित अवस्थेवर जोरदार टीका केली. कुंभमेळ्यात स्नानासाठी जे लोकं गेले होते त्यातील लाखो लोकं हे आजारी पडले. असा दावा करत राज ठाकरेंनी गंगेतील दूषित पाण्यावर परखड भाष्य केलं.  

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून आणलेलं पाणी पिण्यास राज ठाकरेंनी नकार दिला होता. त्यावरून राज ठाकरेंवर बरीच टीकाही झाली. पण आजच्या सभेत या सगळ्या टीकाकारांना राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं

गंगा नदी आणि कुंभमेळ्यावर राज ठाकरेंनी केलेली टीका जशीच्या तशी...

'आमच्या बाळा नांदगावकरने कुंभमेळ्यातून पाणी आणलेलं. मी म्हटलं त्यांना पाणी पिणार नाही. तर नव्याने वारं शिरलेल्यांना वाटलं की, मी कुंभमेळ्याचा अपमान केला.. वेडे आहात का? आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे, आणि आतमध्ये गेल्यावर अहहह.. असं झालं. म्हटलं अहहहह नाही खालून प्रेत गेलं असेल एखादं..'

हे ही वाचा>>  बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेलं गंगेचं पाणी Raj Thackeray का प्यायले नाहीत?

'आपल्या देशातील नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे. ज्याला आपण माता म्हणतो नदीला, देवी म्हणतो.. त्या नद्यांकडे राज्यकर्त्यांचा.. आज नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे. मला आजही आठवतंय की, गंगा साफ करावी असं म्हणणारी पहिली व्यक्ती मला आठवतेय. ती म्हणजे राजीव गांधी.' 

'राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं. तेव्हापासून अजून गंगा साफ करतायेत. 2014 ला मोदी पंतप्रधान झाले. त्यांनीही सांगितलं की, गंगा साफ करणार. आपल्याकडच्या नद्यांची अशी अवस्था आहे की, पाणी पिणं तर लांबची गोष्ट. तुम्ही आंघोळ केली तर.. माझ्याकडे काही उत्तरेतील लोकं येऊन गेले त्यांनी मला सांगितलं की, लाखो लोकं तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेत, पडणारच आजारी.' 

'त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे.. प्रश्न हा गंगेच्या अपमानाचा नाहीए, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीए. पाण्याच्या स्थितीचा आहे. कशाप्रकारचं पाणी तिकडे असतं, होतं.. आणि अजूनही त्या गोष्टी थांबवल्या जात नाही.' 

'खरं तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकतो. सहज एक मिनिटभरासाठी आत्ताची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला दाखवतो.' 

(यानंतर गंगा घाटावरील एक व्हिडिओ राज ठाकरेंनी मोठ्या पडद्यावर दाखवला.)

हे ही वाचा>> LIVE: राज ठाकरेंचं भाषण सुरू, औरंगजेबाच्या कबरीवरून तुफान फटकेबाजी

'ही गंगेची परिस्थिती आतापर्यंत 33 हजार कोटी रुपये यावर खर्च झाले आहेत. तुम्ही आता तो महंत बघितला.. त्याला बोटीतून तसाच्या तसाच टाकून दिला. तिथल्या घाटांवर प्रेतं जाळली जातात. फक्त अग्नि दिल्यासारखं करतात आणि प्रेत तसंच ढकलून देतात पाण्यामध्ये. हा कोणता धर्म?'

'आमच्या नैसर्गिक गोष्टींवर जर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल तर काय करायचं त्याचं? आपल्या गोष्टीत आपण सुधारणा नको का करायला? काळ बदलला लोकसंख्या वाढली. 1000 वर्षांपूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत.' 

'हेच सगळे विधि आटोपण्यासाठी त्याच तिथल्या एखाद्या घाटावर वेगळी जागा करता येत नाही? मग काय सांगता लोकं ऐकत नाही. दारू पिऊन गाडी चालवल्यावर पोलीस अडवतात. हे समजल्यावर लोकं टॅक्सीने जायला लागले की नाही? झाली की नाही सुधारणा.. आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजे. या सगळ्या नद्यांवरचे मधले-मधले भाग इतके गलिच्छ आहेत. या नद्या बरबाद कोण करतोय. तर आपणच करतोय.. आणि कशाच्या नावाखाली तर धर्माच्या नावाखाली..'

'प्रत्येकाला आपआपला धर्म प्यारा असतो, प्रत्येकाने आपल्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजे. ज्यावेळेस हे गंगेवरचं मी हे सगळं पाहत होतो.. मला कळेना की, हे कसं काय चाललंय.'

'काय म्हणे, 65 कोटी लोकं येऊन गेले.. अर्धा भारत चला त्यातील पकडू की 5 लाख VIP. बाकीचे काठावरच बसले असतील खो-खो खेळायला. बरोबर की नाही... अहो प्रत्येकाची 200-200 ग्रॅम जरी पकडली. चीनची भिंत बांधता आली असती. बरं तेही कुठे गेलं.. आपल्याकडे म्हणतात ना. झालं गेलं गंगेला मिळालं..'

'महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थिती देखील हीच.. आमची कोकणातील सावित्री नदी घ्या. सगळी केमिकलने भरली आहे.' अशी जोरदार टीका राज ठाकरेंनी यावेळी केली.

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक महत्त्वाच्या उत्सवावर टीका करणारे हे विधान आगामी काळात वादाला कारण ठरू शकते. राज ठाकरे यांनी यापूर्वीही अशा संवेदनशील मुद्द्यांवर परखड मते मांडली आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली आहे. या विधानावरून धार्मिक संघटना आणि राजकीय पक्ष कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp