Lok Sabha : 38 विरुद्ध 62… प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपला हरवण्याच्या फॉर्म्युला

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Has BJP won the ground under the leadership of PM Modi even before the elections? Is there any scope left for the opposition or not? Election strategist Prashant Kishore sees this matter from a different perspective.
Has BJP won the ground under the leadership of PM Modi even before the elections? Is there any scope left for the opposition or not? Election strategist Prashant Kishore sees this matter from a different perspective.
social share
google news

Prashant Kishor Lok Sabha 2024 Election Prediction : देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तयार झालं आहे. भाजपने 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे, तर काँग्रेसने इंडिया आघाडी स्थापन केली आहे. असं असलं तरी एक चर्चा सातत्याने होताना दिसतेय की, विरोधकांना भाजपला हरवण्याची संधी आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना राजकीय रणनीतीकार आणि जनसुराज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी एक गणित मांडलं आहे.

ADVERTISEMENT

प्रशांत किशोर यांनी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदी अजिंक्य नाही, असे सांगतानाच विरोधकांना त्यांना पराभूत करण्यासाठी संधी मिळाली होती. पण, त्यांनी ती साधली नाही, असेही सांगितले.

मोदी अजिंक्य नाही -प्रशांत किशोर

“मोदी अजिंक्य नाही. 2014 मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांना हरवण्यासाठी विरोधकांना अनेकदा संधी मिळाली, पण त्यांनी ती साधली नाही. 2015 मध्ये बिहारमधील निवडणुकीत भाजपचा पराभव, 2016 मध्ये नोटबंदीनंतरची संधी, 2018 मध्ये निवडणुकीत भाजपचा पराभव. विरोधकांनी प्रयत्न केले असते, तर भाजप बॅकफूटवर गेली असती. पण, असं घडलं नाही आणि भाजपला पुन्हा परतण्याची संधी मिळाली”, असे किशोर म्हणाले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी फुंकले रणशिंग; केली मोठी घोषणा

प्रशांत किशोर असंही म्हणाले की, “भाजपच्या विजयामुळे विरोधकांना सतत संघर्ष करावा लागेल, असं समजणं चुकीचं आहे. भारतात विरोधकांना कमकुवत समजलं जाऊ शकत नाही. विरोधातील पक्ष किंवा ते पक्ष कमकुवत होऊ शकतात, पण भारतात विरोधक कमजोर झालेले नाही”, असे मत त्यांनी मांडले.

भाजपला हरवण्याचं गणित काय?

लोकसभा निवडणुकीत जय-पराभवबद्दलही ते बोलले. प्रशांत किशोर म्हणाले, “हिंदुत्वामुळे जोडली गेलेली व्होट बँक आणि पक्षाचे मजबतू संघटन असूनही भाजपकडे फक्त 38 टक्केच मते आहेत. त्यामुळे आव्हान हे आहे की, उर्वरित 62 टक्के मते कशी मिळवायची. कारण या 62 टक्के व्होट बँकेला आपल्या बाजूने वळवताना दिसत नाहीये. राम मंदिर खूप चर्चेत आहे, पण त्यामुळे मते वाढतील असे दिसत नाहीये. 62 टक्के मतदार आहेत, जे भाजपच्या नरेटिव्हशी सहमत नाहीयेत”, असं त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप आमदाराने महेश गायकवाडांना कुठे कुठे मारल्या गोळ्या? Photo

प्रशांत किशोर यांचं म्हणणं असं आहे की, भाजपला 2019 मध्ये 38 टक्केच मते मिळाली होती. 62 टक्के मते भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे विरोधकांनी 62 टक्के मते आपल्या बाजूने वळवली, तर भाजपला हरवणं शक्य आहे.

ADVERTISEMENT

प्रशांत किशोरांचा विरोधी पक्षांना डोस

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरात तयारी सुरू आहे. मात्र, विरोधक जागावाटपात व्यस्त दिसत आहेत. त्यावर प्रशांत किशोर म्हणाले, “सर्व विरोधक एका खोलीत बसले म्हणून 62 टक्के मते मिळतील, असं होतं नाही. त्यासाठी विरोधकांना एक रणनीती आखावी लागेल. जमिनीवर काम करावं लागेल आणि आपसात जुळवून घ्यावं लागेल”, असं सांगतानाच प्रशांत किशोर असं म्हणाले की, “असंही गृहित धरलं की भाजपची मते 2 टक्क्यांनी वाढून 40 टक्के होतील, अशाही परिस्थितीत 60 टक्के मतांचा कोटा शिल्लक राहतो.”

62 मते मिळवण्यासाठी प्रशांत किशोर यांनी काय सांगितलं?

प्रशांत किशोर असंही म्हणाले की, “जे मतदार भाजपशी सहमत नाहीत, अशा मतांवर विरोधकांनी लक्ष्य करण्याची गरज आहे. विरोधकांनी 60 टक्के मतांपैकी 60 मते मिळवण्यासाठी रणनीती बनवायला हवी. त्यामुळे 30-37 टक्के मते होतील, त्यामुळे विरोधक स्पर्धेत असलेले दिसतील आणि भाजपच्या 38 टक्के मतेही दुभंगायला लागतील”, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT