BJP 1st Candidates List: ब्रेकिंग न्यूज... भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी-शाहांकडून अनेकांना धक्का!

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra assembly election 2024 bjp first list candidates announce mahayuti devendra fadnavis
BJP Candidate 1st list
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

point

भाजपने नेमकं कोणाला दिली उमेदवारी?

point

भाजपने 99 उमेदवारांची यादी केली जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 BJP 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. अशातच आज भाजपने  99 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.यामध्ये चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आली असून नितेश राणे यांनाही संधी देण्यात आली आहे. (maharashtra assembly election 2024 bjp first list 99 candidates announce mahayuti devendra fadnavis bjp maharashtra politics ) 

भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 99 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आली असून नितेश राणे यांनाही संधी देण्यात आली आहे.महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.

पाहा भाजपची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 BJP 1st Candidates List)

राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर  शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या

2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रच बदललं

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.

ADVERTISEMENT

मात्र, निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. 

ADVERTISEMENT

दरम्यान, 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून ठाकरेंचं सरकार पाडलं. यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने राज्यात महायुतीचं सरकार बनवलं. तर 2023 साली अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि ते थेट महायुती सरकारमध्ये सामील झाले. 

यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहेत. ज्यामध्ये दोन्हीकडे 3-3 पक्षांचा समावेश आहे.

कोण आहे भाजपचे 99 उमेदवार? 

1.    नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस
2.    कामठी - चंद्रशेखर बावनकुळे 
3.    शहादा - राजेश पाडवी
4.    नंदुरबार - विजयकुमार कृष्णराव गावित
5.    धुळे -    अनुप अग्रवाल 
6.    सिंदखेडा - जयकुमार जितेंद्रसिंग रावल
7.    शिरपूर - काशीराम वेचन पावरा
8.    रावेर - अमोल जावले
9.    भुसावळ - संजय वामन सावकारे 
10.    जळगाव - सुरेश दामू भोले
11.    चाळीसगाव - मंगेश रमेश चव्हाण 
12.    जामनेर - गिरीश दत्तात्रेय महाजन
13.    चिखली - श्वेता विद्याधर महाले
14.    खामगाव - आकाश पांडुरंग फुंडकर 
15.    जळगाव (जामोद) - डॉ. संजय श्रीराम कुटे
16.    अकोला पूर्व - रणधीर प्रल्हादराव सावरकर
17.    धामगाव रेल्वे - प्रताप जनार्दन अडसद
18.    अचलपूर - प्रविण तायडे
19.    देवली - राजेश बकाने 
20.    हिंगणघाट - समीर त्र्यंबकराव कुणावर
21.    वर्धा - पंकज राजेश भोयर
22.    हिंगणा - समीर दत्तात्रेय मेघे
23.     नागपूर दक्षिण - मोहन गोपालराव माते
24.    नागपूर पूर्व - कृष्ण पंचम खोपडे
25.    तिरोरा - विजय भरतलाल रहांगडाले 
26.    गोंदिया - विनोद अग्रवाल
27.    अमगाव - संजय हनवंतराव पुरम
28.    आमोरी - कृष्णा दामाजी गजबे
29.    बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
30.    चिमूर - बंटी भांगडिया
31.    वानी - संजीव रेड्डी बापुराव बोडकुरवार
32.    रालेगाव - अशोक रामाजी उईके
33.    यळतमाळ - मदन येरवर 
34.    किनवट - भीमराव रामजी केरम
35.    भोकर - सुश्री श्रीजया अशोक चव्हाण
36.    नायगाव - राजेश संभाजी पवार
37.    मुखेड - श्री तुषार राठोड
38.    हिंगोली - तानाजी मुटकुले 
39.    जिंतूर - मेघना बोर्डिकर
40.    परतूर - बबनराव लोणीकर 
41.    बदनापूर - नारायण कुचे 
42.    भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे
43.    फुलंब्री - अनुराधाताई अतुल चव्हाण
44.    औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
45.    गंगापूर - प्रशांत बंब
46.    बगलान -  दिलीप बोरसे 
47.    चंदवड - राहुल दौलतराव अहेर
48.    नाशिक पूर्व - राहुल उत्तमराव ढिकाले
49.    नाशिक पश्चिम - सीमा हिरे
50.    नालासोपारा - राजन नाईक
51.    भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौघुले
52.    मुरबाड - किसन कथोरे 
53.    कल्याण पूर्व- सुलभा कालू गायकवाड कालू गायकवाड
54.    डोंबिवली - रवींद्र चव्हाण
55.    ठाणे - संजय केळकर
56.    ऐरोली  - गणेश नाईक
57.    बेलापूर - मंदा म्हात्रे
58.    दहिसर - मनीषा चौधरी 
59.    मुलुंड - मिहिर कोटेचा
60.    कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
61.    चारकोप - योगेश सागर
62.    मालाड पश्चिम - विनोद शेलार
63.    गोरेगाव - विद्या ठाकुर
64.    अंधेरी पश्चिम - अमीत साटम 
65.    विले पार्ले - पराग अलवणी 
66.    घाटकोपर पश्चिम - राम कदम 
67.    वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
68.    सायन कोळीवाडा - कॅप्टन आर. तमिल सेल्वन
69.    वडाळा - कालिदास कोळंबकर
70.    मलबार हिल - मंगल प्रभात लोढा 
71.    कुलाबा - राहुल नार्वेकर
72.    पनवेल - प्रशांत ठाकुर
73.    उरान - महेश बाल्दी 
74.    दौंड - राहुल सुभाषराव कुल
75.    चिंचवाड - शंकर जगताप 
76.    भोसरी - महेश लांडगे 
77.    शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
78.    कोथरूड - चंद्रकांत पाटील 
79.    पर्वती - माधुरी मिसाळ
80.    शिर्डी - राधाकृष्ण विखे
81.    शेवगाव - मोनिका राजळे 
82.    राहुरी - शिवाजीराव भानुदास कर्डिले 
83.    श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते 
84.    कर्जत जामखेड - राम शिंदे 
85.    केज - नमिता मुंदडा 
86.    निलंगा - संभाजीपाटील निलंगेकर
87.    औसा - अभिमन्यू पवार 
88.    तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील
89.    सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
90.    अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
91.    सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
92.    मान - जयकुमार गोरे 
93.    कराड दक्षिण - अतुल भोसले 
94.    सातारा - शिवेंद्रराजे भोसले 
95.    कणकवली - नितेश राणे 
96.    कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 
97.    ईचलकरंजी - राहुल आवाडे 
98.    मिरज - सुरेश खाडे 
99.    सांगली - सुधीर गाडगिळ

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT