Maharashtra Assembly Election : वंचितची चौथी यादी जाहीर, 'या' 16 जणांना दिली उमेदवारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

prakash ambedkar vanchit bahujan aghadi declare forth list for maharashtra assembly election
वंचितची चौथी यादी जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वंचितची चौथी यादी जाहीर

point

16 जणांची उमेदवारी जाहीर

point

67 मतदारसंघात वंचित कडून उमेदवार जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून खटके उडत असताना तिकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत 16 उमेदवारांची नावे आहेत. हे 16 उमेदवार नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.  (prakash ambedkar vanchit bahujan aghadi declare forth list for maharashtra assembly election) 

विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील यांना रावेर मतदारसंघातून  तिकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 16 उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.

हे ही वाचा : Sanjay Raut: '...तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा विराट मोर्चा निघेल', संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला इशारा

वंचितची चौथी यादी 

अलीबाबा रशिद तडवी : शहागा 
भिमसिंग बटन : साक्री 
भगवान भोंडे : तुमसर 
दिनेश रामरतन पंचभाई : अर्जुनी मोरगाव 
दिलीप राठोड : हदगाव 
रमेश राठोड  : भोकर 
दिलीप तातेराव मस्के : कळमनुरी 
मनोहर जगताप : सिल्लोड
अय्याज मकबूल शाह :कन्नड 
अंजन लक्ष्मण साळवे : औरंगाबाद पश्चिम 
अरूण सोनाजी घोडके : पैठण 
आरीफ अब्दुल्ला खान देशमुख : महाड 
प्रियांका शिवप्रसाद खेडकर : गेवराई
 वेदांत सुभाष भादवे : आष्टी 
 चंद्रकांत जानू कांबळे : कोरेगाव 
 संजय कोंडीबा गाडे : कराड दक्षिण 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान वंचितकडून पहिल्या तीन यादीतून 51 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत 67 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 

हे ही वाचा : Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी युपी मॉडेल का राबवला? Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT