Shrikant Pangarkar: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदे गटात प्रवेश, 'या' पदावर केली नियुक्ती
Shrikant Pangarkar latest News Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून येत्या 20 नोव्हेंबर निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची 'या' पदावर नियुक्ती
या दिवशी श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर
2018 मध्ये श्रीकांत पांगारकरला झाली होती अटक
Shrikant Pangarkar latest News Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून येत्या 20 नोव्हेंबर निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटानेही पक्षाला बळकटी देण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेश सोहळा सुरु केला आहे. अशातच एक मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे. गौरी लंकेश, डॉ नरेंद्र दाभोळकर आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणात आरोप असलेला शिसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरने शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात पक्षप्रेवश केल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
श्रीकांत पांगारकरला दिली मोठी जबाबदारी
गौरी लंकेश, डॉ नरेंद्र दाभोळकर आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणात आरोप असलेला शिसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरने शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात पक्षप्रेवश केला. श्रीकांत पांगारकर याच्यावर जालना विधानसभेची जबाबदारी देण्यात आलीय. गौरी लंकेश प्रकरणात जामिनावर सुटलेल्या श्रीकांत पांगारकर यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेच पांगारकरची शिवसेनेच्या जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी श्रीकांत पांगारकर यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.
हे ही वाचा >> Sanjay Raut : 20 ला निवडणूक, 23 ला निकाल, तर 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट? राऊतांचा थेट शाहांवर निशाणा
2017 मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एसआयटीने अमोल काळे नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं होतं.
हे वाचलं का?
श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता, हे एसआयटीच्या तपासात पुढे आलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. पण 4 सप्टेंबर 2024 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर केला. त्यामुळे तो आता जामिनावर बाहेर आहे. त्याचबरोबर नरेंद्र दोभोळकर प्रकरणात देखील दहशतवाद विरोधी पथक (ATS) त्यांची चौकशी करण्यात आली होती.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: धो धो बरसणार! 'या' राज्यांना यलो अलर्ट, महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT