Mohit Kamboj Vs Gajabhau : मोहित कंबोज यांचं पुन्हा ट्विट, 'गजाभाऊ'कडून पुन्हा उत्तर, म्हणाला बापाचं नाव...

सुधीर काकडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोहित कंबोज विरुद्ध गजाभाऊ...

point

'एक्स'वर रंगला नवा वाद

मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे आता पुन्हा एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे. काल कंबोज यांनी ट्विट करत 'गजाभाऊ' नावाच्या एका अकाऊंटला थेट उचलून आणण्याची धमकी दिली होती. माझं पुढचं टार्गेट गजाभाऊ असं म्हणत मोहित कंबोज यांनी @gajabhauX या आयडीला टॅग केलं होतं. त्यानंतर मोहित कंबोज यांनाही उत्तर मिळालं. आज पुन्हा एकदा कंबोज यांनी 'गजाभाऊ' या युजरला टॅग केलं आणि पुन्हा एकदा कंबोज यांना उत्तर मिळालं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mohit Kamboj : "जिथे असशील तिथून उचलून आणू...", मोहित कंबोज यांचा थेट इशारा, कोण आहे गजाभाऊ?


"धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !" असा स्पष्ट इशारा मोहित कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या युजरला दिला होता. तसंच हर हर महादेव लिहित हे ट्विट सेव्ह करुन ठेवा असंही कंबोज यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा मोहित कंबोज यांनी ट्विट केलं आणि म्हटलं की, "एक बात तो साफ हो गई की 'गजाभाऊ' किसका पालतू (कुत्र्याचं चिन्ह) हैं" 

मोहित कंबोज यांनी आज केलेल्या ट्विटनंतर पुन्हा एकदा गजाभाऊ या युजरकडून मोहित कंबोज यांना उत्तर देण्यात आलं आहे. त्यामध्ये लिहिलंय की, मला उचलून आलं नाही तर कंबोज नाव बदलणार आहेत. 

हे वाचलं का?


'गजाभाऊ'ने काय म्हटलंय?

"कंबोज ने काल रात्री सांगितलं आहे की, जर मी गजाभाऊ ला 60 दिवसांच्या आत उचलून आणलं नाही, तर माझं नाव “मोहित गजाभाऊ गायकवाड. बापाचं नाव 'गजाभाऊ गायकवाड' म्हणून लावणार." असं म्हणत गजाभाऊ नावाच्या युजरने ट्विट थेट मोहित कंबोज यांना टॅग केलं आहे. 

 




हे ही वाचा >> Girish Mahajan: फडणवीसांचे संकटमोचक थेट ठाण्यात, म्हणाले 'शिंदे अजिबात रुसले किंवा चिडलेले...'

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

एकूणच सोशल मिडीयावर रंगलेल्या या वादात अनेकांच्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळातयात. यापूर्वी कंबोज यांनी अनेक नेत्यांना इशारे देत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार यावर दोन्ही बाजूंच्या फॉलोअर्सचं लक्ष असणार आहे.

 


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT