‘नव्या संसदेतील ‘ते’ विधेयक फक्त जुमलाच’, सुप्रिया सुळेंनी सरकारला फटकारले
महिला आरक्षण विधेयकावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी फटकारले मोदी सरकारला फटकारले आहे. नव्या संसद भवनमध्ये ज्या अपेक्षा ठेवून आम्ही आलो आहे, त्या सर्व आशा अपेक्षांना तडे गेले आहेत. त्यामुळे मोदी सरकारचे हे बिलही एक जुमला असल्याचा घणाघात सुप्रिया सुळेंनी केला आहे.
ADVERTISEMENT
Supriya Sule : देशाच्या ज्या दिग्गज लढवय्या नेत्यांनी जुन्या संसदेत बसून अनेक निर्णय घेतले, भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या संसदेत बसण्याचे मला भाग्य मिळाले. त्या जुन्या संसद भवनामुळेच मला नागरिकांच्या समस्या, त्याच्यावर चर्चा आणि अनेक गोष्टींवर मला सवाल उपस्थित करता आले असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी मोदी सरकारवर (modi government) निशाणा साधला. मोठ्या अपेक्षा ठेवून आम्ही नव्या संसद भवनात गेलो होतो, मात्र त्या अपेक्षांना तडे गेल्याची भावनाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.(mp supriya sule criticizes modi government on women reservation)
ADVERTISEMENT
ते विधेयक एक जुमला
ज्या नव्या संसद भवनामध्ये महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. ते महिला आरक्षण 2024, 2029 आणि 2034 लागू होण्याची शक्यता नाही असं म्हणत महिला आरक्षणाचे विधेयकही एक प्रकारचा जुमला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
हे ही वाचा >> दिवसाढवळ्या मनसे नेत्याची झाली होती हत्या, 3 वर्षानंतर आरोपीला ठोकल्या बेड्या
अपेक्षांना तडे
खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, महिला आरक्षण विधेयकाचे आम्ही मोठ्या मनाने स्वागत केले, मात्र तोही एक मोठा जुमला आहे. मोठ्या अपेक्षेने आम्ही नव्या संसद भवनात गेलो होतो मात्र आमच्या अपेक्षेना तडे गेले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
हे वाचलं का?
नियम आणि अटी
नरेंद्र मोदी यांनी हे महिला विधेयक आणले असले तरी हे विधेयक कधी लागू होईल सांगता येत नाही कारण हाही एक जुमला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. कारण हे विधेयक लागू होण्यास वेळ लागणार आहे कारण त्यामध्ये इतक्या अटी आणि नियम लावण्यात आले आहेत की, ते सहजासहजी लागू होईल हे सांगता येणार नाही.
दिग्गजांचा वारसा
खासदार सुप्रिया सुळे यांनी जुनी संसद भवन आणि नव्या संसद भवनविषयी बोलताना सांगितले की, मला जुनी संसद भवन नेहमीच मोठी वाटत आली आहे. कारण त्या जुन्या संसद भवनला बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासारख्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांनी त्या संसदेत अनेक निर्णय घेतले होते. त्यामुळेच मला ती जुनी संसद मोठी वाटते अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘पत्रकारांना ढाब्यावर न्या’, चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले? कारणही सांगितलं
आवाज उठवता आला
जन्या संसद भवनमध्ये मला बारामती मतदार संघातून तीन वेळा लोकसभेत पाठवण्यात आले. त्यामुळे त्या ठिकाणी मला लोकांचे प्रश्न, त्यांच्यावर चर्चा आणि अनेकदा त्यांच्या समस्यांवर आवाज उठवता आला असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT