"घटना अंधारात कोपऱ्यात झाली नाही, त्या मुलीला...", पुणे बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं खळबळजनक विधान!
Supriya Sule Press Conference : "स्वारगेटला जी घटना झाली आणि ज्या पद्धतीनं ती हाताळली गेली, तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे. मला या सरकारकडून जास्त अपेक्षा होत्या".
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

"महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारी.."

सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारला सुनावलं
Supriya Sule Press Conference : स्वारगेटला जी घटना झाली आणि ज्या पद्धतीनं ती हाताळली गेली, तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे. मला या सरकारकडून जास्त अपेक्षा होत्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जो सल्ला दिला आहे की, अशा बाबतीत त्यांच्या मंत्र्यांनी संवेदनशील राहावं. सगळ्यांच्या घरात लेकी सुना आहेत. सगळ्यांच्या घरात मुली आहेत. अशी गलिच्छ घटना झाल्यानंतर कोणत्याही जबाबदार व्यक्तीने पदावर असूदे किंवा नसूदे, अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे. ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे, त्या घटनेला ज्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला आहे. ते खूप दुर्देवी आहे. ही घटना अंधारात कोपऱ्यात झाली नाही. त्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली. आपण सगळ्यांनीच महिलांवर होणाऱ्या कोणत्याही अत्याचाराचा समाज म्हणून जाहीर निषेध केला पाहिजे, असं मोठं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, "महाराष्ट्रामध्ये गेले अनेक दिवस आणि महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात प्रचंड गुन्हेगारी वाढल्याचं दिसतंय. गुन्हेगारी जी वाढली आहे, त्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार..चाकणला जी घटना घडलीय, ती धक्कादायक आहे. चाकणला वर्दीत असणाऱ्या पोलिसावर कोयता गँगने अटॅक केलाय. रक्षाताई खडसेंच्या मुलीसोबत पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं ते अतिशय वाईट आणि धक्कादायक आहे. मी त्याचा निषेध करते. स्वारगेटसारख्या अनेक घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत. या खूप दुर्देवी आहेत. मी त्याचा जाहीर निषेध करते".
हे ही वाचा >> Pune : पोलीस आणि दरोडेखोर आमने-सामने, कोयत्यांना गोळीबाराने उत्तर, थरारात पोलीस जखमी, आरोपी अटक
"बदलापूरची घटना झाली, तेव्हाही फडणवीस यांना विनंती केली होती की, महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं, फास्टस्ट्रॅक कोर्टात अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे, हे माझं मत आहे. इथल्या झोनच्या डिसीपींनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की, या महिलेनं आरडाओरडा केला नाही. राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणतात तिने स्ट्रगल केला नाही, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे धक्कादायक आहे. याचा मी जाहीर निषेध करते.
हे ही वाचा >> 3 March 2025 Gold Rate : ग्राहकांनो! आजच सोनं खरेदी करा, सोन्या-चांदीच्या भावात 'इतक्या' रुपयांनी झाली घट
महाराष्ट्र सरकारला मी प्रश्न विचारते की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं बोलता मग या केसमध्ये सरकारकडून जे काही स्टेटमेंट आले हे योग्य आहे? कुणाच्या तरी घरातील ती मुलगी होती. ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य करणं हे कुणालाही शोभत नाही. माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी जो चाप ओएसडी आण पीए बद्दल लावला आहे. तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावाव, एवढीच माझी अपेक्षा आहे", असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.