North Maharashtra Assembly Election 2024 Full Schedule: उत्तर महाराष्ट्रात कोण जिंकणार? 'या' तारखेला मतदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

North Maharashtra Assembly Election 2024 date
North Maharashtra Assembly Election 2024 date
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर महाराष्ट्रात कोण जिंकणार? महाविकास आघाडी की महायुती?

point

उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार?

point

उत्तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत विजयी पताका कोण फडकवणार?

North Maharashtra Assembly Election 2024 Full Schedule: Date, Voting and Results: नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (15 ऑक्टोबर) राजधानी दिलेल्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित केली. 20 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्रातील विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. ही विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून सर्वात महत्वाचा विभाग असलेल्या उत्तर महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान घेतलं जाणार आहे. (north maharashtra assembly election 2024 full schedule date voting and results in marathi on which date will polling be held in north maharashtra)

या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील मतदार नेमकं कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहे. अशावेळी उत्तर महाराष्ट्रात नेमकं कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार? याबाबात राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा करून निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम-

अधिसूचना जारी होण्याची तारीख- २२ ऑक्टोबर २०२४
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- २९ ऑक्टोबर २०२४
अर्ज छाननीचा दिवस- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ०४ नोव्हेंबर २०२४
मतदानाचा दिवस- २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणीची तारिख- २३ नोव्हेंबर २०२४

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या महत्त्वाच्या विभागात विधानसभेची निवडणूक कधी होणार याची माहितीही देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT