West Maharashtra Assembly Election Full Schedules: कोण मारणार मैदान? पश्चिम महाराष्ट्रात 'या' तारखेला मतदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

West Maharashtra Assembly Polls 2024
West Maharashtra Assembly Polls 2024
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पश्चिम महाराष्ट्रात किती तारखेला होणार निवडणूक?

point

पश्चिम महाराष्ट्रात कोणती आघाडी मारणार बाजी?

point

विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत वाचा सविस्तर माहिती

2024 West Maharashtra Election Schedule, Voting and Results Date: नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (15 ऑक्टोबर) राजधानी दिलेल्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित केली. 20 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्रातील विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर 2024 ला या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. ही विधानसभा निवडणूक एका टप्प्यात होणार असून सर्वात महत्वाचा विभाग असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान घेतलं जाणार आहे. (west maharashtra assembly election 2024 full schedule Voting and results in marathi and latest updates on which date will polling be held in west maharashtra)

या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील मतदार नेमकं कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहे. अशावेळी पश्चिम महाराष्ट्रात नेमकं कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार? याबाबात राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा करून निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : निवडणुकांची रणधुमाळी, महायुती लोकसभेचा वचपा काढणार?

Click here for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Full Schedules:

West Maharashtra Election: पश्चिम महाराष्ट्र निवडणूक कार्यक्रमाविषयी महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम-

ADVERTISEMENT

अधिसूचना जारी होण्याची तारीख- २२ ऑक्टोबर २०२४
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- २९ ऑक्टोबर २०२४
अर्ज छाननीचा दिवस- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ०४ नोव्हेंबर २०२४
मतदानाचा दिवस- २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणीची तारिख- २३ नोव्हेंबर २०२४

ADVERTISEMENT

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या महत्त्वाच्या विभागात विधानसभेची निवडणूक कधी होणार याची माहितीही देण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT