Narendra Modi: "महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत फाशी आणि...", PM नरेंद्र मोदी संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Prime Minister Narendra Modi said those committing crimes against women will not be spared.
Prime Minister Narendra Modi said those committing crimes against women will not be spared.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'लखपती दीदी' मेळाव्यात नरेंद्र मोदी काय म्हणाले? 

point

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान

point

"गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणीही त्यात छेडछाड करणार नाही"

PM Narendra Modi On Womens Sexual Assault Cases :  गेल्या काही दिवसांपासून महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनामुळं देशात संतापाची लाट पसरली आहे. लोकांनी या घटनांविरोधात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून राजकीय वातावरणही तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावच्या लखपती दीदी मेळाव्यात मोठं विधान केलं. मोदी म्हणाले, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कडक कायदे करत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणीही त्यात छेडछाड करणार नाही, याबाबतही आम्ही निर्णय घेतला आहे. या गुन्ह्यांबाबत वेगानं तपास सुरु करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळण्यातही मदत होईल. अल्पवयीन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची नव्या कायद्यात तरतूद केली गेली आहे.(Prime Minister Narendra Modi made a big statement at Jalgaon's Lakhpati Didi Mela. Modi said, our government is making strict laws to give strict punishment to those who oppress women. We have also decided that no one will tamper with the case after it is registered)

'लखपती दीदी' मेळाव्यात नरेंद्र मोदी काय म्हणाले? 

इतक्या मोठ्या संख्येत देशातील महिला आण बहिणी या मेळाव्यात आल्या आहेत. पहिले तक्रारी यायच्या की वेळेवर गुन्हा दाखल होत नाही. सुनावणी होत नाही. खटल्यांना वेळ खूप लागतो. अशा अनेक अडचणींना भारतीय न्याय संविधानाने दूर केलं आहे. यामध्ये संपूर्ण चाप्टर महिला आणि मुलांसोबत होणाऱ्या अत्याचारसंबंधी केलं आहे. जर पीडित महिलांना पोलीस स्टेशनमध्ये जायचं नसेल, तर घरात बसल्याही एफआयएर करू शकतात.

हे ही वाचा >> "पंतप्रधानांनी आधी आमच्या दीदींना सुरक्षा द्यावी, नंतर..."; 'लखपती दीदी' मेळाव्यापूर्वी संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणीही त्यात छेडछाड करणार नाही, याबाबतही आम्ही निर्णय घेतला आहे. या गुन्ह्यांबाबत वेगानं तपास सुरु करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळण्यातही मदत होईल. अल्पवयीन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची नव्या कायद्यात तरतूद केली गेली आहे. लग्नाच्या नावाखाली धोका दिल्याचे प्रकरणंही समोर येतात. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीत राज्य सरकारच्या सोबत आहे. आपल्याला भारताच्या समाजाकडून या पापी मानसिकतेला थांबवावं लागेल. भारत विकसित होण्याच्या मार्गावर जात आहे आणि त्यात महाराष्ट्राच्या भूमीचं मोठं योगदान आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गेल्या दोन महिन्यात ११ लाख लखपती दीदी बनल्या आहेत. लखपती दीदींमुळे कुटुंबाचं भाग्य बदललं आहे. पुढील पिढीला सशक्त करण्यासीठी हा अभियान राबवला जात आहे. महिलांसाठी मोदी सरकारनं विविध योजना आणल्या. बहिणाबाईंची कविता आजही समासाठी प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्रातला कोणताही कोपरा असो किंवा इतिहासातील कोणताही कालखंड असो, मातृशक्तीचा योगदान अप्रतिम राहिला आहे. 

हे ही वाचा >> UPS, NPS आणि OPS मध्ये नेमका फरक काय? एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती

आज देशभरातील लाखो सखी मंडळांसाठी ६ कोटींहून अधिक रुपये जारी केलं आहेत. लाखो बचत गटांशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील आमच्या भगिनींनाही कोट्यावधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांच्या माध्यमातून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यासाठी मदत होईल. तुम्ही सर्वांनी मला महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. महाराष्ट्राचे हे संस्कार भारतातच नाही, तर जगात पसरलं आहे. मी कालच परदेश दौऱ्यातून भारतात परतलो. मी यूरोपच्या पोलंड देशात गेलो होतो. तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन घडलं. महाराष्ट्राची संस्कृती आणि येथील संस्कारांचं दर्शन घडलं. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप सन्मान करतात, असंही मोदी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT