प्रियकरासोबत मिळून कट रचला, 42 वर्षीय महिलेनं पतीला संपवलं, 'त्या' फोनमुळे पोलिसांकडून 3 तासात उलगडा
Pune Crime: लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या प्रकरणाच यशस्वीरित्या उलगडा केला आहे. मृताचं नाव रवींद्र काशिनाथ काळभोर असं आहे. मृत व्यक्ती आणि त्याची पत्नी लोणी काळभोरमधील वडळे वस्ती येथील रहिवासी आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट

प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं

झोपेत असताना फावड्याचा दांडा डोक्यात मारला
Pune News : पुणे जिल्हा पुन्हा एका हत्येच्या प्रकरणामुळे हादरला आहे. लोणी काळभोर परिसरात एका 45 वर्षाच्या व्यक्तिची हत्या झाली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे हे सगळं पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच घडवून आणल्याचं या तपासात समोर आलं आहे.
हे ही वाचा >> लग्न ठरलं, प्री-वेडिंग झालं, पण मुलगा आवडेना... मुलीने थेट दीड लाखात सुपारी दिली
महिलेनं प्रियकरासोबत मिळून रचला कट
मृत व्यक्तीच्या पत्नीचे एका पुरूषासोबत विवाहबाह्य संबंध होते. आपला पती या संबंधांना अडचणीचा ठरत असल्यामुळे त्यांनी दोघांनी पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून हा कट रचला होता. लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या प्रकरणाच यशस्वीरित्या उलगडा केला आहे. मृताचं नाव रवींद्र काशिनाथ काळभोर असं आहे. मृत व्यक्ती आणि त्याची पत्नी लोणी काळभोरमधील वडळे वस्ती येथील रहिवासी आहेत.
गोरखने फावड्याच्या दांड्यानं केला हल्ला
31 मार्च रोजी रात्री 11 वाजता रवींद्र झोपेत असतानाच त्याच्यावर फावड्याच्या दांड्याने हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 1 एप्रिलला सकाळी 7:30 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि श्वान पथकासह घटनास्थळी पोहोचले. तेव्हाच त्यांनी तपास सुरू केला होता.
हे ही वाचा >> Beed : कोयत्यानं तरूणावर सपासप वार, उपचारादरम्यान जीव सोडला, मृत्यूआधी आईला म्हणाला आपली जात...
हल्ला झाला त्या दिवशीही दोघांचा फोन
डीसीपी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही रहिवाशांची चौकशी केली. तेव्हा तपासात असं आढळून आलं की रवींद्रची पत्नी शोभा काळभोर (42) हिचे गोरख त्र्यंबक काळभोर (41) सोबत विवाहबाह्य संबंध होते. तर दुसरीकडे रवींद्र हा त्याच्या पत्नीला दारू पिऊन मारहाण करायचा असंही समोर आलंय. याच कारणांमुळे दोघांनीही रवींद्रची हत्या करण्याचा कट रचला होता. ज्या दिवशी रवींद्रवर हल्ला झाला, त्यादिवशी गोरख आणि शोभा यांचा रात्री फोन झाला. त्या फोनवर पोलिसांना संशय आला होता.
शोभा घरी नसताना, दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या अवघ्या तीन तासांत पोलिसांनी हा सगळा प्रकार उघड केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी हे प्रकरण उलगडणाऱ्या तपास पथकाचे नेतृत्व केलं.
दरम्यान, भारतीय न्याय संहिताच्या कलम 103, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.