Shivdeep Lande : 'माझं नाव कुणाशीही जोडू नका', राजीनाम्यानंतर अखेर IPS शिवदीप लांडेंनी सगळं क्लिअर केलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

shivdeep lande reaction on speculation about contesting election or joining any political party
माझी कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा सुरू नाही
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा सुरू नाही

point

कोणत्याही पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचा विचार नाही.

point

कृपया मला कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडू नये.

IPS Shivdeep Lande On Political Entry : मराठमोळे आयपीएस अधिकारी ज्यांची 'सिंघम' अशी ओळख आहे. त्या शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. शिवदीप लांडेंच्या राजीनाम्याची सध्या जोरात चर्चा होतेय. शिवदीप लांडे यांची ओळख करुन द्यायची गरज नाही. एक दबंग अधिकारी असलेले लांडे सतत चर्चेत असतात. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई.  लांडे आता राजकारणात एन्ट्री करणार हीच चर्चा सगळीकडे सुरु झाली. लांडे खरंच राजकारणात एन्ट्री करणार? करणार तर कुठल्या पक्षात जाणार, महाराष्ट्रात विधानसभा लढवणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी स्वता काही गोष्टी क्लिअर केल्यात. (shivdeep lande reaction on speculation about contesting election or joining any political party) 
 
बिहार केडरचे आयपीएस अधिकारी पूर्णिया रेंजचे आयजी शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून ही माहिती दिली.  लांडे यांनी फेसबुकवर लिहिलंय की, "माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. इतक्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्याही वर ठेवले आहे. मला मान्य आहे की जर माझ्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात काही चूक झाली आहे, मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण भविष्यातही मी बिहारमध्येच राहणार आहे, बिहार माझी कर्मभूमी आहे.' 

हे ही वाचा : IT Rule amendments : मुंबई हायकोर्टाचा केंद्राला मोठा झटका, आयटी नियमांमधील बदल केले रद्द

शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी.  बिहार कॅडर मिळाल्यानंतर शिवदीप यांनी अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली. अनेकदा त्यांची बदली रद्द करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळालं. त्यांच्या कामाचं कौतुक मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील अनेकदा केलंय.शिवदीप लांडे हे मध्यंतरी मुंबईत महाराष्ट्र पोलिस सेवेतही कार्यरत होते.  

लांडे यांनी राजीनाम्यामागे कारण सांगितलं नसलं, तरी ते राजकारणात जातील असं बोललं जात होतं. मात्र या चर्चेचं उत्तर स्वता लांडे यांनी पुन्हा एक फेसबुक पोस्ट करुन दिलंय. ''सर्वप्रथम, मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो, कारण कालपासून मला जे प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे, त्याची मी कल्पनाही केली नव्हती. काल माझ्या राजीनाम्यानंतर, काही माध्यमं आणि लोक अशी शक्यता व्यक्त करत आहेत की कदाचित मी कोणत्यातरी राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे.''

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या पोस्टच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बोललेलो नाही आणि कोणत्याही पक्षाच्या विचारधारेमध्ये जाणार नाही. कृपया माझे नाव कोणाशीही जोडू नका. 

तुर्तास तरी लांडे यांनी राजकारणात जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता ते नक्की काय करणार याचं उत्तर आगामी काळात नक्कीच कळेल.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Big Boss Marathi: '...म्हणून मी निक्कीच्या थोबाडीत मारली', आर्या जाधवचा मोठा खुलासा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT