Sanjay Raut: शिल्पकाराला सुपारी कोणी दिली? शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेमागे ठाणे कनेक्शन?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut vs Eknath Shinde
Sanjay Raut vs Eknath Shinde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

PM मोदींच्या माफीनाम्यानंतर संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

point

संजय राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही केली सडकून टीका

point

शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून राऊतांनी विरोधकांना दिला इशारा

Sanjay Raut On PM Narendra Modi : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण येथील कार्यक्रमात माफी मागितली. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींची माफी राजकीय असल्याचं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. "प्रत्येक वेळी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कृती करायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासीयत आहे. पण महाराष्ट्रानं तुम्हाला माफ केलेलं नाही. हे तुम्हाला कळेल. या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी शिवरायांच्या अपमानात जी भूमिका बजावली आहे.

त्याचा तपास कोण करणार? आरोपींना अटक कोण करणार? शिल्पकाराला काही कोटींची सुपारी कोणी दिली? त्यांची नावे समोर कधी येणार? सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलं आहे, मग त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार? पुतळ्यामागचं जे ठाणे कनेक्शन आहे. त्या ठाणे कनेक्शनचा मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर सूत्रधार आहे. त्याचा राजीनामा कोण घेणार? त्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही", असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.(Prime Minister Narendra Modi has apologized for the incident of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj. However, Thackeray group MP Sanjay Raut has attacked the opposition saying that Modi's apology is political)

संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

"(पंतप्रधान नरेंद्र मोदी) त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांचा निषेध केला. मोदी गो बॅक...मोदी गो बॅक...मोदी परत जा, अशा घोषणा दिल्या. मोदींनी पाहिलं असेल की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि संतापाचा लाव्हा महाराष्ट्रात उसळला. त्यामुळे आपण जर माफी मागितली नाही, तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली. प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Udayanraje Bhosale : PM मोदींच्या माफीनाम्यानंतर खासदार उदयनराजे भोसलेंचं प्रसिद्धीपत्रक व्हायरल

उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माफी मागितलेली बरी. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आत्मियता असण्याचं कारण नाही. माफी मागून जर प्रश्न सुटत असेल, तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना राज्यातील लोकांनी दिलेला दिसतो. प्रधानमंत्र्यांनी मागितलेली माफी पूर्णपणे राजकीय स्वरुपाची आहे. या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांनी हे केलं. पण त्या माफीतून प्रश्न सुटत नाही. या सरकारकडून ज्या प्रकारचा घोर अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात झाला आहे, मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे", असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.

हे ही वाचा >> Viral Video : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा! पोलिसांनी केला लाठीचार्ज; तरुणांनी केलं असं काही...

राऊत विरोधकांवर टीका करत पुढे म्हणाले, मोदींनी त्यांचं काम केलं. महाराष्ट्र महाराष्ट्राचं काम करेल. उद्यापासून सरकारला जोडे मारण्याचा जो कार्यक्रम सुर होणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही. उद्या ११ वाजात सन्माननीय शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक, लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील. प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असतं, दु:ख असतं तर पाच वर्षांपूर्वी पुलवामात ४० जवानांची हत्या झाली. तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असती. जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होत आहे, त्याबद्दल माफी मागितली असती. महिलांवरील अत्याचाराच्या घटनेंची वाढ होत आहे, त्याबद्दल माफी मागितली असती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT