Santosh Banger: ''तुम्ही हुशाऱ्या झ#@X...', शिंदेंचे आमदार संतोष बांगरांची अधिकाऱ्याला शिवीगाळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

santosh banger audio clip viral abuse rto officer eknath shinde mla hingoli news maharashtra politics
संतोष बांगराची अधिकाऱ्याला शिवीगाळ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आमदार संतोष बांगराची अधिकाऱ्याला शिवीगाळ

point

आरटीओ अधिकाऱ्याला दमदाटी करत केली शिवीगाळ

point

ऑडिओ क्लिप होतेय व्हायरल

Santosh Banger Audio Clip Viral : ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली : शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर नेहमीत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता बांगर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष बांगर (Santosh Banger) आरटीओ अधिकाऱ्याला (RTO Officer) शिविगाळ करतानाची घटना घडली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी एक गाडी पकडली होती. ही गाडी सोडवण्यासाठी बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना घडली आहे. या संदर्भातली ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे मुंबई तक या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. (santosh banger audio clip viral abuse rto officer  eknath shinde mla hingoli news maharashtra politics) 

आमदार संतोष बांगर आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची एक ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की, आरटीओ अधिकारी हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी एक गाडी पकडली होती. आणि ती गाडी सोडून द्या असं आमदार बांगर यांचे म्हणणं होतं. परंतु आपण कारवाई करतोय त्यासाठीच ही गाडी पकडली आहे असे आरटीओ अधिकारी या संभाषणामध्ये सांगत आहेत. त्यावरूनच आमदार बांगर यांनी  त्या आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. या दरम्यान आरटीओ अधिकारी आणि आमदार बांगर यांच्यात काय संभाषण झाल आहे हे वाचूयात. 

हे ही वाचा : PM Modi: 'मी नतमस्तक होऊन माफी मागतो', शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी PM मोदींचा माफीनामा

ऑडिओ क्लिपमध्ये काय? 

आमदर बांगर: कोण आरटीओ का ?
आरटीओ अधिकारी: हो बोलतोय साहेब 
आमदार बांगर :आमदार बांगर बोलतोय 
आरटीओ अधिकारी: साहेब नमस्कार बोला ना साहेब 
आमदार बांगर : पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या मोठ्या लाईनच्या गाड्या आपण आपल्याला एक सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे.
आरटीओ अधिकारी: थेंबा थेंबा ने तळ असतं म्हणाल्या सारखं कारवाई करतोय 
आमदार बांगर : *थेंबा थेंबा ने कशाच श@X उपटायच तळ साचत का हो गोरगरिबाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या लाईनच्या गाड्या श@X उपटायला पकडता का तुम्ही, हुशाऱ्या @xx#थेंबा थेंबा न कशाचा मायेच्या #&@x#xx तळ साचायले का  हो रे थेंबा थेंबा न तळे साचणार वाल्या हो रे, गोरगरिबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडायच्या मलिदा तिकडून मिळाला की विषय क्लोज गोरगरिबाच्या मायला घोडे लावायचे का हे धंदा आहे का तुमचा 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : खरंच 31 ऑगस्टला अर्जाची मुदत संपतेय का...काय आहे शेवटची तारीख?

आरटीओ अधिकारी : असं बोलल्यावर आम्ही काय बोलणार 
आमदार बांगर: आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा थेंबाने तळस असते तर या गरीबाच्या थेंबाने तळे साचवणार का तुम्ही लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही त्यांच्याकडे तर तुमची पर्ची देता तुम्ही आगाऊ नाटकं करू नका ती गाडी सोडून द्या
आरटीओ अधिकारी : साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये 
आमदार बांगर: काय शेतकऱ्याची नाहीये, म्हणता शेतकऱ्याचे आहे तेव्हा तर लावून दिला ना त्यांनी फोन शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून द्या ती इकडे ऐका आरटीओ साहेब गाडी सोडून द्या ती नाहीतर  26 तारखेपर्यंत बिझी आहे मी 27-28 तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाईम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या लावेल  मला माहित आहे आरटीओ ची काय परिस्थिती असते ते, असे संभाषण आरटीओ आणि संतोष बांगर यांच्यात झालं आहे. दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता संतोष बांगर यांच्यावर टीका होत आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT